बीएमसी सफाई कामगारांच्या मोडकळीस आलेल्या इमारतीकडे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष
मुंबई महानगपालिकेतील सफाई कामगारांची ही धोकादायक इमारत, पूर्णपणे मोडकळीस आलेली असून ही इमारत कधीही कोसळून जीवित हानी होऊ शकते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारत खाली करण्याचे आदेश देऊन ही नागरिक इमारतीतून बाहेर जाण्यास तयार नाहीत. आश्रय योजना अंतर्गत सफाई कामगारांना घरी देखील दिली जात नाहीत. पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.
X
मुंबईतील प्रभादेवी म्युनिसिपल सफाई कर्मचाऱ्यांची ही शासकीय वसाहत, वसाहतीची दृश्य पाहिल्या नंतर कोणत्याही नागरिकाला संताप येऊ शकतो. तरीदेखील स्थानिक रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन का राहतात हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल. या इमारतीला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या इमारतीत गेले 50 वर्षापासून महानगरपालिकेचे सफाई कामगार भाडेतत्त्वावर राहतात. काही ठिकाणी स्लॅपला लोखंडी रॉडने आधार देऊन रहिवाशांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. आज ना उद्या इमारत कोसळून आमच्या जीवाची हानी होणार हे माहिती असताना देखील स्थानिक रहिवासी तिथून बाहेर पडायला तयार नाही.
आमचा जीव गेला तर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असतील असं स्थानिक नागरिक सध्या म्हणत आहेत कारण महानगरपालिकेने नोटीस देऊन ही त्यांना दादर विभागातील कासारवाडी या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केला परंतु त्या वसाहतीत ना लाईटीची सोय आहे. ना पाण्याची सोय. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. तसा तो भाग नागरिकांच्या दृष्टीने गरदुल्यांचा असल्याने आमच्या जीवाला तिथे धोका असल्याचा स्पष्ट केलंय.
महानगरपालिकेच्या शासकीय इमारतीचे महानगरपालिकेने यापूर्वी दुरुस्तीचे काम दोन ते तीन वर्षांपूर्वी केले होते. तरी देखील इमारतीतील काही भागात स्लॅप कोसळयाचे चित्र पुन्हा ऐकदा पाहायला मिळतंय. आम्हाला कासारवाडी जायचं नाही पण आश्रय योजने अंतर्गत सफाई कामगारांना भाडेतत्त्वावर तरी घरे मिळावीत. अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांच्या कडून केली जात आहे. सध्या ह्या सफाई कामगारांचे प्रती महिना दहा हजार रुपये भाडे कपात होत आहे. ज्यांनी कोरोनाच्या काळात मुंबई स्वच्छ ठेवण्याची काम केली त्या सफाई कामगारांना आधार देण्याची एेवजी निराधार का केलं जातं याच उत्तर महानगर पालिकेकडे देखील नसेल. 2013 मध्ये डॉकयार्ड रोड या ठिकाणी मोडकळीस आलेली इमारतीकडे महानगरपालिकेने दुर्लक्षित पणा केला होता. दुर्दैवाने बीएमसी ची शासकीय इमारत कोसळली आणि 14 जणांना आपला प्राण गमावावा लागला.
याच प्रभादेवीतील म्युनिसिपल सफाई वसाहत मध्ये आजूबाजूच्या परिसरात दीडशे लोकांची बैठी वस्ती आहे. इमारत कोसळली तर आजूबाजूच्या लोकांना आपले प्राण गमवावे लागतील. सध्या याच इमारतीमध्ये एक मुलगा आणि एक महिला यांच्या डोक्यात स्लॅप कोसळून गंभीर जखमी झालेली आहेत. असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे.
तेथील स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याशी आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला. तिथले स्थानिक लोक कासारवाडी येथे जाण्यास तयार नाहीत. कासारवड्यातील इमारत आधीच रिडेव्हलपमेंट मध्ये गेली आहे. त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने महालक्ष्मी येथे नवीन इमारतीत पर्याय म्हणून त्यांची व्यवस्था करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया मॅक्स मराठीशी बोलताना दिली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये स्थानिक नगरसेवकांनी दिलेल्या प्रतिक्रियेला सकारात्मक भूमिकेत सफाई कामगारांसाठी काय पर्याय निघतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.