Home > Election 2020 > भाजपानं हिसकावली दलित व्होट बॅक

भाजपानं हिसकावली दलित व्होट बॅक

भाजपानं हिसकावली दलित व्होट बॅक
X

देशात दलित आणि मुस्लिम हे पारंपरिकपणे कॉंग्रेसचे मतदार मानले जातात. भाजपाचे अनेक दिग्गज नेते ही व्होट बॅक आपली नाही,असं मानतात. मात्र, या निवडणूकीत ही गृहितकं बदलली असून भाजपानं कॉंग्रेसची व्होट बॅक हिसकावली असल्याचं समोर आलंय.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांचं आयएएनएस आणि सीवोटर या एजन्सीनं केलेलं विश्लेषण प्रसिद्ध झालंय. या एजन्सीच्या आकडेवारीनूसार लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त ५१.६ टक्के सवर्ण हिंदू आणि ४७.१ % मागासवर्गीय मतदारांनी भाजपप्रणीत एनडीएला मतदान केलंय. तर यूपीएला सर्वात जास्त ४०.८ % मागासवर्गीय आणि ०.१ % आदिवासींनी मतदान केलं आहे. ही माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस आणि सीवोटरच्या विश्लेषनामध्ये समोर आलीय. त्य़ामुळं यावेळी रालोआनं युपीएला मागे टाकत दलितांची मतं मिळवली आहेत.

या आकडेवारीनुसार एनडीएला सत्तेत पुन्हा येण्यासाठी ४७.१ % ओबीसी, ४३.२ % एसटी आणि ३९.५ % एससी मतदारांनी मतं दिली आहेत. यावेळी काँग्रेस प्रणित यूपीए वर ओबीसींनी विश्वास दाखवल्याचं दिसत नाही. त्यांना सर्वात कमी म्हणजे २५.४ % मतं मिळाली. यूपीएला ३०.१ % एसटी आणि २९.१ % एससी मतदारांचं समर्थन मिळालंय.

धर्म आणि जातिनिहाय मतांचं विश्लेषण केल्यावर ही बाब समोर आलीय की, ५१.६ % सवर्ण हिंदू मतदारांनी मोदी आणि एनडीएवर विश्वास दाखवला आहे. तर ४५.७ % ख्रिशन आणि ३८.२ % शीख मतदारांनी एनडीएला मतदान केलंय. सर्वात जास्त ४०.८ % मुस्लिम मतदारांनी मतदान केलं. याव्यतिरिक्त २८ % शीख आणि २७.८ % ख्रिशन मतं यूपीएला मिळवता आली. त्यामुळं या लोकसभा निवडणूकीत भाजपानं दलितांची आणि ओबीसींची मतं मिळवत कॉंग्रेसची व्होट बॅक तोडण्यात यश मिळवलंय़. याचं मुख्य कारण म्हणजे भाजपानं निर्माण केलेला राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा मुद्दा. या मुद्द्यामुळं दलित, आणि ओबीसीमधील तरूण मतदारांनी यावेळी कॉंग्रेसला नाकारत मोदींच्य़ा पारड्यात मतं टाकली आहेत. त्यामुळं दलित म्हणजे कॉंग्रेसचा मतदार हे समीकरण आता पुसलं गेलं असून भाजपानं ही मतं हिसकावत विजय मिळवल्याचं दिसतंय.

Updated : 27 May 2019 7:31 PM IST
Next Story
Share it
Top