Home > Election 2020 > सभागृहाबाहेर भाजपचा पराभव!

सभागृहाबाहेर भाजपचा पराभव!

सभागृहाबाहेर भाजपचा पराभव!
X

आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन ग्रँड हयात येथे शक्ती प्रदर्शन केलं आहे. या शक्ती प्रदर्शनात अपक्ष आमदारही उपस्थित होते. यावेळी महाआघाडीच्या एकूण १६२ आमदारांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे. त्यामुळं सभागृहाच्या पटला अगोदरच देवेंद्र फडणवीस सरकारचा सभागृहाबाहेर पराभव झाला आहे.

हे ही वाचा

97 हजार कोटी – 72 हजार कोटी = अजित पवारांवर आता 25 हजार कोटींचा आरोप

अजित पवार आणि भाजपा मध्ये नक्की डील काय झालंय…

Maha Political Twist LIVE: सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला, उद्या निकाल…

 news, bjp, shisvena, ncp, congress, politics, maharashtra, election, maxmaharashtraजर आपण आकड्याचं गणित पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकड्यांनुसार भाजप 105, राष्ट्रवादीचे 54, अपक्ष : 14 असे एकूण मिळून फडणवीस यांना कागदपत्रानुसार 173 आमदारांचा पाठींबा आहे. तर विरोधकांचा विचार केला तर 288-173 = 115 आमदार विरोधात आहे.

 news, bjp, shisvena, ncp, congress, politics, maharashtra, election, maxmaharashtraमात्र, प्रत्यक्षात आज हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये फडणवीस सरकारच्या पूर्णपणे विरोधात चित्र दिसलं. महाविकास आघाडीकडे प्रत्यक्षात एकूण 162 आमदार आज पाहायला मिळाले. शिवसेना 56, राष्ट्रवादी 53, कॉंग्रेस 44, अपक्ष 09 असे एकूण 162 आमदारांची संख्या हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये पाहायला मिळाली.

त्यामुळे आज प्रत्यक्षात आमदारांची संख्या पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांनी कागदावर सिद्ध केलेले बहुमत प्रत्यक्षात तरी अस्तित्वात नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आज भाजपचा सभागृहाबाहेर तरी पराभव झाला असंच म्हणावा लागेल. त्यामुळे सभागृहाच्या पटलावर फडणवीस सरकार कसं बहुमत सिद्ध करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated : 25 Nov 2019 8:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top