Home > मॅक्स रिपोर्ट > बार्शीच्या विशाल फटेचा महाविशाल घोटाळा

बार्शीच्या विशाल फटेचा महाविशाल घोटाळा

बार्शीच्या विशाल फटेचा महाविशाल घोटाळा केला असून लोकांना कोट्यावधीला गंडा घातला आहे.फसवणुकीचा आकडा 200 कोटींच्या आसपास जाण्याचा पोलिसांचा अंदाज,प्रकरणाचा तपास ईडी, किंवा सिबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आला आहे.

बार्शीच्या विशाल फटेचा महाविशाल घोटाळा
X

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरासह सोलापूर, पुणे,कर्नाटक येथील लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा घोटाळा उघडकीस आला असून फसवणुकीचा आकडा 200 कोटीं रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 76 लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीचा आकडा 18 कोटींच्या पुढे गेला आहे.दिवसेंदिवस या प्रकरणातील तक्रारी वाढत असून या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून यामध्ये प्रकरणाचा मास्टरमाइंड विशाल फटेच्या वडील व भावाचा समावेश आहे.विशाल फटेच्या शोधार्थ पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून या प्रकरणात बार्शीतील व्यापारी,सरकारी नोकरदार,राजकारणी,डॉक्टर यासह पोलिसांनी गुंतवणूक केली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.या प्रकरणात काळा पैसा गुंतवलेल्या लोकांची गोची झाली असून पुणे,सोलापूर, कर्नाटक येथील लोकांनी पैसे गुंतवल्याचे समोर येत आहे.फसवणूक प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला असून बार्शीतील घराघरात,चहाची टपरी, हॉटेल,बसस्थानक, सरकारी कार्यालय,व्यापारी वर्ग,सर्वसामान्य जनतेतून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा गुंता मोठा असल्याने याचा तपास ईडी किंवा सिबीआयकडे देण्याची मागणी बार्शी शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर व मनीष देशपांडे यांनी केली आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी कशी तयार झाली

सर्वसाधारण या घोटाळ्याची सुरुवात 2019 साली झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. दीपक फटेने बार्शी शहरात विशालका कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि.,अलका शेअर सर्व्हिसेस व जे.एम.फायनान्शियल या तीन वित्तीय कंपन्या स्थापन केल्या.त्यामध्ये लोकांना गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात येत होते.परंतु त्याप्रमाणे परताव्याची रक्कम माघारी न देताच पसार झाला आहे. त्यामुळे काही लोकांचे अश्रू अनावर झाले असल्याचे पहायला मिळत आहे. या फसव्या गुंतवणुकीत अनेकांनी जमीन-जागा,सोने गहाण ठेऊन व प्रसंगी कर्ज काढून पैसे भरले आहेत.अनेकांनी आपली आयुष्यभराची जमवलेली जमा पुंजी यात लावली आहे.त्यामुळे काही कुटूंब उघड्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्याची सुरुवात जशी एखाद्या घोटाळ्याची असते त्याप्रमाणे झाली.परंतु ते नागरिकांच्या लक्षात आले नाही.विशाल फटे लोकांना गुंतवणूक करण्यासाठी आकर्षण करीत असे.2019 साली या घोटाळ्याला वेग मिळाला नाही.परंतु महत्वाची घटना 2020 साली घडली.कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने लोक घरी बसून होते.त्यामुळे लोकांना आर्थिक चणचण भासू लागली होती.त्यामुळे लोक या गुंतवणुकीकडे फास्ट ओढले गेले.अशी माहिती समोर येत आहे.

प्रतिष्ठित लोकांनी केली गुंतवणूक

बार्शीतील व्यापारी,राजकारणी,सरकारी खात्यातील अधिकारी,डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले असल्याची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी देखील पैसे गुंतवले असल्याचे बोलले जात आहे.परंतु ते समोर यायला तयार नाहीत असे लोकांचे म्हणणे आहे.या योजनेमध्ये विशाल फटे काही सेलिब्रिटीना पैसे द्यायचा आणि त्यांचा रोल मॉडेल म्हणून उपयोग करीत असे.त्यामुळे अनेक लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले असल्याची माहिती मिळत आहे.

विशाल चालवत होता नेट कॅफे

विशाल फटे बार्शीत नेट कॅफे चालवत होता.फिर्यादी दीपक आंबीरे याची ओळख दीपक कामानिमित्त नेट कॅफेत आल्यानंतर झाली.ओळखीतून दिपकने यात पैसे गुंतवले व त्याचा परतावा पण मिळाला असे सांगितले जात आहे.हळूहळू लोकांनी यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.त्यातून रक्कम वाढत गेले.पण लोकांना परतावा मिळेना गेला.त्यामुळे या प्रकरणाचे बिग फुटण्यास प्रारंभ झाला.आता त्याचा उद्रेक झाला असल्याचे पहायला मिळत आहे.संशयित आरोपी विशाल फटे याची बँक खाती पोलीस प्रशासनाने गोठवली असून फिर्यादी दीपक आंबीरे याला घेऊन पोलीस पथके विविध ठिकाणी आरोपी विशाल फटेच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.यामुळे बार्शी व शहर परिसरात खळबळ झाली असून तालुक्यात विविध चर्चाना उधाण आहे.या फसवणुकीमुळे गुंतवणूकदारांची भंबेरी उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलीस स्टेशनला तक्रारदारांची रीघ पण माध्यमासमोर बोलण्यास नकार

बार्शी शहर पोलीस स्टेशन येते फसवणूक प्रकरणातील तक्रारदारांची रीघ लागली असून या प्रकरणावर बोलण्यास तक्रारदार टाळत आहेत.काहीजण गुपचूप येऊन तक्रार नोंदवत आहेत. ज्या पाहुण्यांनी या प्रकरणात पैसे गुंतवायला सांगितले होते.त्यांची मात्र घाबरगुंडी उडाली असल्याचे दिसते.तक्रार द्यायला आलेले काही नागरिक पाहुण्यांना शिव्या घालताना दिसले.तर काहीजण अत्यंत उद्विग्न झाले होते.त्यांच्या चेहऱ्यावर पैसे मिळतील का नाही याची चिंता लागून राहिल्याचे दिसत होते.बार्शी शहरातील काही नागरिक या प्रकरणाची मजा घेताना दिसत होते.त्यांच्या म्हणण्यानुसार यात गरीब लोकांचे नुकसान झाले नाही तर अवैद्य धंदे करणारे व पैसेवाल्यांचे पैसे गेल्याने आनंद होत आहे.अशा काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या.पण काहीजनांनी जमीन जागा विकून पैसे गुंतवले असल्याने त्याचे ही दुःख होत आहे.अशा ही काहीजणांनी प्रतिक्रिया दिल्या.

फसवणुकीचे प्रकरण का घडले

यामध्ये काही माध्यमानी पेड बातम्या देऊन विशाल फटेची चांगली इमेज तयार केली.त्यामुळे लोक या गुंतवणुकीकडे ओढले गेले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.तसेच विशाल फटेला पेड अवार्ड देखील दिली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मिडीयाने हे प्रकरण उकरून काढायला पाहिजे होते पण ते होताना दिसले नाही.1 रुपया गुंतवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी 2 रुपये झाले आहेत. असे आजपर्यंत मानव इतिहासात घडले नाही.परंतु लोकांना झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हा घोटाळा झाला आहे.बार्शी शहरात 5 ते 7 वर्षापूर्वी अशीच फसवणुकीची घटना घडली होती.त्या फसवणुकीतील लोक पुन्हा या प्रकरणात अडकले आहेत अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी दिली.

सर्व सत्तेचे एका ठिकाणी केंद्रीकरण

ज्यावेळेस सर्व प्रकारच्या सत्तेचे केंद्रीकरण एका ठिकाणी होते.त्यावेळेस 90 टक्के लोक सत्तेच्या मागे जातात.विशाल फटेच्या ठिकाणी सामाजिक,राजकीय,आर्थिक, मीडियाच्या सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने अंध भक्त तयार झाले व लोकांनी यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली.आज त्यांची फसवणूक झाली असल्याचे दिसत आहे.असे दीनानाथ काटकर यांना वाटते.

या प्रकरणाचा तपास ईडी किंवा सिबीआयकडे देण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते यांची मागणी

या प्रकारणाचा गुंता मोठा असल्याने याचा तपास ईडी किंवा सिबीआयकडे देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मनीष देशपांडे व दीनानाथ काटकर यांनी केली आहे.या फसवणुकीच्या प्रकरणात काही बड्या अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केली आहे.ज्यांनी कोणी हा घोटाळा केला आहे.त्याला बड्या अधिकाऱ्यांनी वाचवण्याचे काम केले आहे.असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केला आहे.लोकांचे पैसे माघारी मिळावेत अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत असे आरोपी गजाआड होत नाहीत.तोपर्यंत दुसऱ्या घोटाळ्याला हेच लोक जन्म देत राहणार असे दीनानाथ काटकर यांचे म्हणणे आहे.

Updated : 17 Jan 2022 6:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top