ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले ; सुशिक्षितांची भामट्यांकडूनच होतेय फसवणुक...
हल्लीचे युग हे धावपळीचे असून, कोणालाच वेळ नाही. याकरिता ऑनलाईन शॉपींग हा उत्तम पर्याय आहे. परंतु, ही शॉपींग करताना खबरदारी घेणेही आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन व्यवहार जेवढे सोयीचे झाले आहेत, त्याच्या किती तरी पटीने धोक्याचे आहेत. मोबाईल व ऑनलाईन धारकांनी थोडी जरी काळजी घेतली तरीही ही फसवणूक टाळता येईल. सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून यात लोन ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, शहरांबरोबरच ग्रामीण भागात हे प्रकार वाढत असल्याने दक्षता घेण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात येत आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा रिपोर्ट....
X
यासह डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या नावाखाली सुद्धा जास्त फसवणूक होऊ आहे. बोगस कस्टमर केयर च्या नावाखाली सुद्धा अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास केले जात आहेत. यासह इतर माध्यमातून सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. ही फसवणूक रोखणे शक्य आहे यासाठी फक्त नागरीकांनी थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. चालू वर्षात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार 274 झाले असून ही आकडेवारी 2021 मध्ये 242 वर होती तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून चालू वर्षात 137 प्रकार घडले आहे तर ही आकडेवारी 2021 मध्ये 208 होती. जिल्ह्यात ऑनलाईन होणारी फसवणूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक व सायबर विभाग सतर्क असून ही फसवणूक रोखण्यासाठी नागरीकांनी सुद्धा सावधगिरी बाळगावी.
ऑनलाईन शॉपींगमुळे वेळेची बचत होते. घरच्या घरी बसून आपण क्रेडिट व डेबीट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपींग करु शकतो. इंटरनेट बॅकींगच्या मार्फतही आपल्याला असा व्यवहार करता येतो. काय घ्यावी काळजी ऑनलाईन खरेदी करताना पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण पासवर्ड तयार करताना लक्षात राहावे, याकरिता आपले नाव किंवा आडनावाचा वापर करतात. परंतु, यामुळे तुमचा पासवर्ड मिळविणे सहज शक्य होतो. तसेच आपला पासवर्ड हा दर तीन महिन्याला बदलत राहावा. पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नये. खरेदी करताना डेबीट व क्रेडिट कार्डवरील क्रमांक हा गोपणीय ठेवावा. इतरांच्या मोबाईल तसेच इंटरनेट कॅफेवरुन कधीही ऑनलाईन शॉपींग करु नये. त्यामुळे आपली डिटेल माहिती मिळविणे कुणालाही सहज शक्य होते.
त्याकरिता स्वत: च्या उपकरणाद्वारेच शॉपींग करावी. बाहेर कोणत्याही ठिकाणी आपण खरेदी केल्यानंतर आपले कार्ड हे त्यांच्या हातात देऊ नये. त्याकरिता स्वत: आपला पासवर्ड टाकून ते स्वॅप करावे. ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तेथे कधीही आपल्या कार्डद्वारे पेमेंट करु नये. कॅमेयामुळे आपल्या कार्डचा पासवर्ड त्यांना सहज मिळू शकतो. शॉपींग करताना वेबसाईटची खात्री करण्याकरिता यूआरएल टाकून ती चेक करावी. तसेच युजर नेम व पासवर्ड टाकण्यासाठी व्हर्च्युअर बॉक्सचा वापर करावा. त्यामुळे ते स्टोअर होत नाही. क्रेडिट कार्ड व्यवहारात एसएमएस ॲलर्टचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. शक्यतो कॅश ॲन डिलीव्हरीचा पर्याय निवडावा. खरेदीनंतर आलेले ई- बिल तपासून घ्यावे. . आर्थिक तपशील भरतानाही काळजी घ्यावी.
काय आहेत धोके आपला जर पासवर्ड गहाळ झाला तर आपणे सर्व ऑनलाईन व्यवहार तात्पुरते बंद होतात. तो पासवर्ड कुणाला सापडला तर मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन शॉपींग करताना, आपल्याला काय वस्तू खरेदी करावयाची आहे. हे नीट लक्षात ठेवावे. अन्यथा आपल्या चुक ीमुळे पाहीजे नसलेली वस्तू आपल्याला मिळते. उत्सावानिमित्त शॉपींग करताना अधिक धोका होण्याची शक्यता असतेफसवणूकीत वाढऑनलाईनमुळे कोणताही व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. परंतु, डिटेल माहिती विचारुन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. सुशिक्षीत असूनही अनेकांची भामट्यांकडून फसवणूक होते.
बॅकेतून बोलत असल्याची थाप मारुन, ही फसवणूक केली जाते. याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने नेहमी अशा प्रकाराला बळी न पडण्यासाठी जनजागृती केली जाते. तरीही हे प्रकार वाढतच आहेत. हे सर्व प्रकार दररोज सर्रास घडत आहेत. तरीही नोकरीच्या नावाखाली ऑनलाईन अर्ज मागवून पैसे उकळून फसवणूकीचे प्रकार होत आहेत. त्याकरिता ऑनलाईन व्यवहार हे चांगले आहेत. परंतु, त्याची सावधगिरीही बाळगावी. त्याचबरोबर ऑनलाईन मागविलेल्या वस्तूची खातरजमा करणेही आवश्यक आहे. ग्राहक मंचातही आपल्याला यासंबंधीची तक्रार नोंदविता येते. त्याकरिता पुरावे हे महत्वाचे आहेत.
2019 मध्ये फक्त ऑनलाईन फसवणूकीचा एकच गुन्हा होता
बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 2019 मध्ये जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचा एकच गुन्हा नोंद होता. त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2020 मध्ये हिच आकडेवारी 12 वर गेली, 2021 मध्ये तर 61 गुन्हे नोंद झाल्याची माहिती सायबर विभागाने दिली. तसेच चालू वर्षात तर हिच आकडेवारी 93 वर गेली आहे. यामुळे दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत असून हे रोखण्यासाठी नागरीकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असून विविध प्रकारचे आमिष दाखवून ही फसवणूक होते. हे प्रकार रोखणे खुप सोपे आहे, यासाठी फक्त नागरीकांनी थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. बँक कधीच ग्राहकांना ओटीपी विचार नाही यामुळे कोणीही ओटीपी शेअर करु नये यासह ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ बँकेशी किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी आम्ही सतर्क आहोत, यात मोबाईल धारकांनी सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे, असे बीड पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
पुर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन फसवणूक जास्त होत आहेत. यात सर्वात जास्त फसवणूक लोन ॲप, बोगस कस्टमर केयर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होत आहे. यासह इतर ॲपच्या माध्यमातून सुद्धा ही फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखता येऊ शकते, यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासह बोगस लिंक क्लिक करु नयेत, या लिंकच्या माध्यमातून आपला महत्वाचा डाटा शेअर होते व याचे दुष्परिणाम जास्त होतात. यामुळे नागरीकांनी ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सायबर विभागाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करुन नागरीकांना ऑनलाईन फसवणूकीपासून सावध करत आहोत, असे सायबर विभागाचे प्रमुख रविंद्र गायकवाड यांनी सांगितले.