Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : सरकार बदलले पण जनतेच्या समस्या कायम

Ground Report : सरकार बदलले पण जनतेच्या समस्या कायम

राज्यातले सत्ताधारी बदलले तरी जनतेच्या समस्या मात्र कायम राहतात, हे अनेकदा समोर आले आहे. असाच एक न सुटलेला प्रश्न आणि त्यामुळे सामान्यांना कोणत्या यातना भोगावे लागतात, याचे वास्तव मांडणारा धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट

Ground Report : सरकार बदलले पण जनतेच्या समस्या कायम
X

राज्यात सत्तापालट झाला असला तरी जनतेच्या समस्या मात्र कायम असल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. असाच एक कायम चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था.. मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल (पळस्पे) ते इंदापुर या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पण सध्या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांनी आजवर कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले आहेत. महामार्गाच्या दूरवस्थेबाबत माध्यमानी सातत्याने वास्तव मांडले आहे. महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाबाबत आणि पडलेल्या खड्ड्यांबाबत जनतेत असंतोष आहे. गेली अनेक वर्षे महामार्गाचे सुरू आहे. मागील वर्षी गणेशोत्सव उत्सवाच्या वेळी खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. आतातरी सरकारने मुंबई गोवा महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी जनतेची विनंती आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल, पेण, नागोठणे, माणगाव, महाड़, पोलादपुर येथील जीवघेण्या परिस्थितीचा प्रवासी , रुग्णांना मोठा फटका बसतोय. मोटारसायकल स्वार यांची तर परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांचा प्रवास अक्षरश: मृत्यूच्या जबड्यातून होतोय. कोकणात विविध पक्षाचे अनेक दिगग्ज व मातब्बर नेते असूनही महामार्गाच्या कामात सुधारणा होत नाही, याबाबत कोकणवासीय जनतेसह पर्यटक, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

शिवसेना, भाजप, शिंदे सरकारची सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असून सर्वसामान्य जनतेचा वाली कोण असा संतप्त सवाल जनमानसातूंन विचारला जात आहे.

Updated : 9 July 2022 9:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top