गावातच `बाप` आयटी कंपनी उभारली; शेतकऱ्यांच्या मुलांना घरातूनच लाखोंचा पगार
X
ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी टॅलेंट असूनही मनाजोगी नोकरी मिळत नाही. संघर्ष करुन आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. आयटीचे जाळे महानगरांमध्ये पसरलेले असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्यांना आयटी क्षेत्राचा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र एका ध्येयवेड्या तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील पारेगाव खुर्द या १२०० लोकवस्तीच्या खेड्यात आयटी कंपनी उभारली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा हा 'बाप' प्रयोग इतरांसाठी पथदर्शी ठरणारा आहे.
अमेरिकेत स्वतःची कंपनी असतानाही रावसाहेब घुगे या तरुणाने शेतकऱ्यांच्या मुलासाठी काही तरी करण्याचं ठरवलं. त्यातूनच बाप कंपनीची संकल्पना पुढे आली. थेट अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द गावात त्यांनी या कंपनीचं काम सुरू केलं. आता ते शेतकऱ्यांच्या पोरांना भरघोस पगाराची नोकरीही देत आहेत.आयटीचे जाळे महानगरांमध्ये पसरलेले असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्यांना आयटी क्षेत्राचा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र एका ध्येयवेड्या ग्रामीण भागात आयटी कंपनी उभारून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे संस्थापक रावसाहेब घुगे सांगतात.
आयटीमध्ये खूप चांगल्या संधी असूनही गावाकडची मुले अनेक अडचणींमुळे या संधीपासून दूर राहतात, याची खंत नेहमी त्यांच्या मनात असायची. शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचे या उद्देशाने त्यांनी या कंपनीचे बांधकाम हाती घेतले असून ते प्रगतिपथावर आहे. जूनमध्ये प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होणार आहे. यूएसमध्ये स्वतःची आयटी कंपनी असूनही आपल्या गावासाठी आणि परिसरासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घुगे यांनी घेतला आहे. या आयटी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना गावात राहूनच जागतिक स्तरावर नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या आयटी कंपनीत बारावी पास होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे. इंटर्नशिपप्रमाणे त्यांना तीन वर्षे योग्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर याच कंपनीत नोकरीदेखील दिली जाणार आहे.
ग्रामीण मुलांना नोकरीच्या संधी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४ वर्षांत ५०० ते ६०० मुलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे.
वास्तविक संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या १२०० लोकवस्ती आलेल्या गावातील ३७ वर्षीय रावसाहेब घुगे हा तरुण गावातच खडकाळ माळरानावर स्वतःची आयटी कंपनी उभारली आहे. रावसाहेब हे सध्या यूएसमध्ये आयटी कंपनी चालवतात. आयटीमध्ये खूप चांगल्या संधी असूनही गावाकडची मुले अनेक अडचणींमुळे या संधीपासून दूर राहतात, याची खंत नेहमी त्यांच्या मनात असायची. मात्र शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचे या उद्देशाने रावसाहेब यांनी पारेगाव खुर्द या आपल्या कोरडवाहू खेड्यात BAAP या नावाने आयटी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शहरात जावून नोकरी करणं शक्य नसलेल्या कल्पना सारख्या महीलांना गावातच रोजगार मिळाला आहे, असे इथे काम करणाऱ्या महीला कर्मचारी कल्पना शेटे म्हणाल्या.
सध्या या कंपनीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. कंपनीत शेतकऱ्यांच्या प्राधान्य दिले जाणार असून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन नोकरी देखील दिली जाणार आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे बाप कंपनीचे कर्मचारी सांगतात.
पारेगाव खुर्द या आपल्या अवर्षणग्रस्त खेड्यात 'बाप' (बिझनेस ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स) या नावाने आयटी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची ४५ मुले-मुली घुगे यांच्याशी जोडली गेली आहेत.
विशेष म्हणजे शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या तरुणांना गावातच रोजगार निर्माण झाल्यानं पुढील काळात गावाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं दिसत असल्याचे बाप कंपनीत काम करणारा तरुण रावसाहेब सानप सांगतात.
घुगे यांची 'द बाप' आयटी क्षेत्रात काम करणारी कंपनी वेगवेगळे संगणकीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करते. ई-कॉमर्स, बँकिंग, ह्यूमन रिसोर्स आदी तीन ते चार डोमेनमध्ये काम करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. विशेष म्हणजे यातील सर्व क्लायंट अमेरिकेतील आहेत.
शेतकऱ्यांची ४५ मुलं-मुली घुगे यांच्याशी जोडली गेली असून सध्या ते घरूनच ऑनलाईन काम करत आहेत. यूएसमध्ये आयटी कंपनी सांभाळून गावाकडे कंपनी सुरू करताना रावसाहेब घुगे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या मुलांना गावात राहूनच जागतिक स्तरावर नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 'गावाकडे चला' हा महात्मा गांधींचा संदेश प्रत्यक्षात अमलात येतोय एवढे मात्र नक्की.