Home > मॅक्स रिपोर्ट > भीड में अकेले.. आशा भोसलेंना आला धक्कादायक अनुभव

भीड में अकेले.. आशा भोसलेंना आला धक्कादायक अनुभव

भीड में अकेले..  आशा भोसलेंना आला धक्कादायक अनुभव
X

ज्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी तुफान गर्दी होते अशा आशा भोसलेंना गर्दीतही एकटेपणाचा अनुभव आलाय. सोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळी असूनही आशा ताईंसोबत बोलायला कोणी नव्हतं, याची खंत व्यक्त करणारा एक फोटो आशा ताईंनी ट्वीट केल्यानंतर तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आशाताईंसोबत सुदेश भोसले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर नामवंत या फोटोमध्ये दिसतायत. सर्वच्या सर्व आपापल्या फोनमध्ये बिझी दिसतायत. आशाताई खिन्नपणे बसलेल्या दिसतायत.

ग्रॅहम बेल वरून ट्रोलींग

आशाताईंनी फोनमध्ये बिझी असलेल्या सर्वांच्या बाबतीत खिन्न प्रतिक्रीया देताना धन्यवाद ग्रॅहम बेल असं म्हटलंय. त्यावरून मोबाईल चा शोध ग्रॅहम बेल यांनी लावला नाही, अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आशाताईंच्या भावना लक्षात घ्या, अशा प्रतिक्रीया ही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

डिस्कनेक्ट टू कनेक्ट

जगभरात गाजली जाहीरात

मोबाईल वापरू नका अशी जाहीरात एका मोबाईल कंपनीनेच केली आणि जगभरात मोबाईलच्या अतिवापरावर मंथन सुरू झालं. थायलंड मध्ये एका मोबाईल कंपनीने डिस्कनेक्ट टू कनेक्ट नावाची एक जाहीरात कँपेनच सुरू केली होती. अतिकनेक्ट राहिल्यामुळे आपण आपल्या आयुष्यातले बहुमोल क्षण वाया घालवतो, त्यामुळे मोबाईल डिस्कनेक्ट करून नात्यांना कनेक्ट व्हा, मित्रांना कनेक्ट व्हा अशी ती जाहीरात होती. या जाहीरातीची आता जगभर कॉपी करून जाहिराती तयार केल्या जात आहेत.

धक्कादायक! दोन वर्षांच्या मुलालाही मोबाईलचं व्यसन

Updated : 14 Jan 2019 10:57 AM IST
Next Story
Share it
Top