बाई सोयीला...

बाई सोयीला...
X

“मर्द शेतकऱ्याच्या आत्महत्यायनं हादरले सारे. त्याच्या करुण कहान्यानं हेलावले. मात्र, आम्हा बायकायच्या जगन्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसला... बाई सोयीले असते.” वैशाली येडे यांनी याच भाषणाने संमेलनाचे उद्घाटन केले आणि आम्ही “विधवा” नाहीत आम्हाला एकल म्हणा असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. या भाषणाच्या निमित्ताने एकल महिलांचे प्रश्न समोर आले. ऐरवी काही काही संघटना पुरते मर्यादित राहणारा हां विषय चर्चेला आला.

पुरुषांच्या करुण कहान्या दिसल्या मात्र बाईच कर्तृत्व दिसत नाही हे एकल महिलांच दुःख त्यानी मांडल, विधवा परितक्त्या या शब्दातच असलेली नकारात्मक भावना सतत त्या बाईचा पाठलाग करत रहाते तिने काहिही केले तरी तीची अलख ही नेहमी तिच्या लग्नाच्या स्थितीवरून केली जाते. परंपरेने व पुरुषसत्ताक व्य्वस्थेने बाईला तिची ओळख दिलीच नाही. सतत दुय्यम भूमिका महिलेला देणारी व्यवस्था महिला जेव्हा स्वतःची ओळख करायला जाते तेव्हा तिच्या वाट्याला दुखच येते. शहरातील असो कि ग्रामीण भागातील एकल महिलेला व्यवस्था ही शांत जगु देत नाही. नवरा नसलेली बाई ही सर्वांसाठीच उपलब्ध, तिला कोणी वाली नाही असे समजून तिच्यावर अनेकदा लैगिक अत्याचारही केले जातात, किंवा त्या दुष्टिने तिच्याकडे पाहिले तरी जाते. ना कुठल्या आर्थिक मोकळीक सतत कुठल्याना कुठल्या गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते.

शहरातल्या एकल स्त्रियांची प्रश्न आणखी वेगळे. आर्थिक स्थिती बरी असली तरी जीवन जगण्याचा संघर्ष कमी नाही. मुंबईसारख्या मोठय़ा शहरातही तरुणींना ती एकटी आहे म्हणून भाडय़ाने घर मिळत नाही. शिक्षणासाठी आपले गाव सोडून अनेक मुली मोठय़ा शहरात येत आहेत. शहरामध्ये अनेक अपार्टमेंट, सोसायटय़ांनी एकल स्त्रियांना भाडय़ाने घर देऊ नये असा नियमच बनवला आहे. हॉटेलमध्येही स्थिती काही वेगळी नाही. अविवाहित एकल स्त्री म्हणून जगत असताना अनेकींना वेगवेगळ्या अडचणीतून जावे लागते. कधी आजारी पडलं तर मैत्रिणीशिवाय कोणी मदतीला नसते.

बाई ही सोयीला नाही तर एकल महिलांही माणूस आहे, तुमची सोय बघू नका हे सांगायची वेळ वैशाली येडे यांनी उत्तम साधली आहे.

Updated : 12 Jan 2019 4:06 PM IST
Next Story
Share it
Top