‘स्टंट क्वीन’ फिअरलेस नाडियाचा स्मृतीदिन
X
आज फिअरलेस नाडिया म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री मेरी इवान्स यांचा स्मृतीदिन. जन्म.८ जानेवारी १९०८ पर्थ येथे झाला. फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते. मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले.
नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली. लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या.
पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.
नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे.
द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३