मुंडे भावा-बहिणीत आणखी एक वादाची ठिणगी
X
अर्भकांचे आरोग्य टांगणीवर ठेवत महिला व बालविकास विभागामार्फत होत असलेल्या 'बेबी केअर किट' खरेदीच्या व्यवहारात भ्रष्टाचार असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच भ्रष्ट ठेकेदारांच्या हिताला जपणाऱ्या सरकारचा त्यांनी निषेध नोंदविला आहे.
या योजनेतंर्गत राज्यातील नवजात अर्भकांसाठी १७ वस्तूंचा समावेश असलेली बेबी केअर कीट सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत युनीसेफचा सल्ला न घेता महिला व बालविकास विभागामार्फत ही खरेदी होत असून यात अनेक भ्रष्ट ठेकेदारांचा हात धूवून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. यावरुनच लक्षात येते की धनंजय मुंडे यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच या संपूर्ण खरेदी प्रक्रियेची तातडीने चौकशी व्हावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत किटखरेदीस स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.