Home > Election 2020 > पवारांचा दिल्लीत जाणिवपूर्वक अपमान की अनावधाननं झालेली चूक ?

पवारांचा दिल्लीत जाणिवपूर्वक अपमान की अनावधाननं झालेली चूक ?

पवारांचा दिल्लीत जाणिवपूर्वक अपमान की अनावधाननं झालेली चूक ?
X

देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात पाचव्या क्रमांकातील रांगेचा पास देण्यात आल्यानं, हा अपमान समजून पवारांनी सोहळ्याला उपस्थित न लावता थेट मुंबईला परतणं पसंत केलं.

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना प्रोटोकॉल प्रमाणे पहिल्या क्रमांकावरील रांगेत जागा देणं अपेक्षित होतं. या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी पवार यांच्या कार्यालयाला कळविण्यात आलं होतं. त्याचवेळी पवारांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावर पवारांच्या कार्यालयातून आक्षेप घेत पहिल्या रांगेतील जागेची मागणी प्रोटोकॉलप्रमाणे केली होती. त्यामुळं पहिल्या रांगेचा पास मिळेल म्हणून पवार हे दिल्लीला गेले होते. मात्र, प्रत्यक्ष शपथविधीच्या दिवशी जो पास पवारांना देण्यात आला, तो पाचव्या रांगेचाच होता. त्यामुळं नाराज झालेल्या पवारांनी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा हा अपमान जाणिवपूर्वक करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झालीय, तर सामान्य नेटिझन्सपैकी काहींना ही चूक अनावधाननं झाल्याचं वाटतंय.

Updated : 30 May 2019 10:33 PM IST
Next Story
Share it
Top