का साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन?
X
आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. हे आपल्याला कसे कळले? तर व्हाट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मिडीयावर आलेल्या मेसेजमुळे… आज काल आपण सर्व डेज् आलेला मेसेज दुसऱ्याला फॉरवर्ड करत साजरे करतो. मात्र आपण तो दिनविशेष का साजरा करतो? त्या दिवसाचा इतिहास काय आहे? त्याची सुरुवात कशी झाली? याची पुसटशी कल्पना देखील आपल्याला नसते.
मुख्य उद्देश आणि हेतू
दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत असताना जगात अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत असून वसुधरेेचे आयुष्य धोक्यात आल्याची जाणीव पर्यावरण तज्ज्ञांना झाल्यानं "पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं" हा हेतू समोर ठेवून समाजात पोषक वातावरणाची निर्मिती करणे" या उद्देशानं ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
हे वाचा: शिवसेना-भाजपमध्ये "तुझ्या गळा माझ्या गळा"?
यामुळे साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन?
वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा बेसुमार वापर, कार्बनचे वाढलेले प्रमाण आणि जागतिक तापमान वाढ यामुळे पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान कार्बनच्या वाढलेल्या प्रमाणामुळे ओझोन वायुला धोका निर्माण होऊन सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर थेट येऊ लागल्यानं निसर्गावरील मानवाच्
केव्हा पासून साजरा केला जातो जागतिक दिन?
पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा धोका हळूहळू संपूर्ण जगाला जाणवू लागला. या धोक्याचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत चालले असून येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम फक्त आपल्यालाच नाही तर प्राण्यांना पक्षांना किटकांना म्हणजेच पृथीवरील सर्व सजीवांना भोगावे लागतील. याची जाणीव संपूर्ण जगाला होऊ लागली. आपलं पर्यावरण वाचवून सर्वांना शुद्ध वातावरणात जगता यावं म्हणुन पर्यावरण संरक्षणासाठी ५ जून १९७२ या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने स्वीडन मधील स्टॉकहोम याठिकाणी बदलत्या वातावरणाची दखल घेत एक महत्व पूर्ण बैठक घेतली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७४ पासून संपूर्ण जगात ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा केला जाऊ लागला.
हे वाचा: मोदी मंत्रिमंडळाचा होणार विस्तार? सेनेला काय मिळणार?
पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक देशांनी सहभागी व्हावं यासाठी १९८७ पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येतं. २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे आहे. प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालणं ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.