Home > Election 2020 > विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
X

राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. मुख्यत: मराठवाडा आणि विदर्भातील जनता उकाड्यानं हैराण झाली आहे. त्यातच आज विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. रविवारी मराठवाड्यातील परभणी येथे देशातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील दिवसात राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Updated : 22 April 2019 9:06 AM IST
Next Story
Share it
Top