Home > मॅक्स रिपोर्ट > "अल्लाहू अकबर..जय हनुमान, सबको सन्मती दे भगवान", सामान्य नागरिकाचा आक्रोश...

"अल्लाहू अकबर..जय हनुमान, सबको सन्मती दे भगवान", सामान्य नागरिकाचा आक्रोश...

अल्लाहू अकबर..जय हनुमान, सबको सन्मती दे भगवान, सामान्य नागरिकाचा आक्रोश...
X

पेट्रोल-डिझेलचे वाढते तर...महागाई....लोडशेडिंग याऐवजी सध्या राज्यात गाजतेय....अजान, मशीद..मंदीर आणि हनुमान चालीसा....घरात आणि मंदिरात येणारे हे विषय आता रस्त्यावर आले आहेत...विरोधक आणि सत्ताधारीही यात गुंतले आहेत....मग सामान्यांच्या प्रश्नांवर कोण बोलणार...म्हणूनच मग एक सामान्य नागरिकच आता रस्त्यावर उतरला आहे....वाढती महागाई आणि लोडशेडिंग विरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी अनोखे आंदोलन केले आहे....

मंगेश साबळे यांनी फुलंब्री तालुक्याअंतर्गत येत असलेल्या आळंद येथील MSEB च्या उपकेंद्रात MSEB विरोधात आंदोलन केले.विरोधक आणि सत्ताधारी सध्या सगळेच धार्मिक वाद आणि जातीय संघर्षात दंग आहेत...सामान्य नागरिक मात्र आपली दखल कधी घेतली जाणार याच विवंचनेत आहे...राजकीय पक्षांनी एका सामान्य नागरिकांच्या ह्या संतापाची दखल घेतली नाही तर उद्या उद्रेकही होऊ शकतो....

Updated : 23 April 2022 8:08 PM IST
Next Story
Share it
Top