Home > मॅक्स रिपोर्ट > गावगुंडांमुळे अनुसूचित जातीतील कुटुंबाला सोडावे लागले गाव, पोलीस संरक्षणानंतर कुटुंब परतले

गावगुंडांमुळे अनुसूचित जातीतील कुटुंबाला सोडावे लागले गाव, पोलीस संरक्षणानंतर कुटुंब परतले

आजही ग्रामीण भागात अनुसूचित जातींमधील लोकांवर कशाप्रकारे अन्याय होतो याचे उदाहरण समोर आले आहे.

गावगुंडांमुळे अनुसूचित जातीतील कुटुंबाला सोडावे लागले गाव, पोलीस संरक्षणानंतर कुटुंब परतले
X

गावगुंडांमुळे अनुसूचित जातीमधील एका कुटुंबाला तब्बल तीन वर्ष आपले घर आणि गाव सोडून गावोगाव भटकण्याची वेळ आल्य़ाचा प्रकार घडलाय. वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील धानोरा घाडगे गावातील ही घटना आहे. पांडुरंग शेगोकार व त्यांचे भाऊ या गावात राहतात. पण या गावातील सवर्ण कुटुंबातील आरोपींनी या कुटुंबातील महिला, मुलं आणि पुरूषांचा छळ केल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. जिवाच्या भीतीने या लोकांना गावापासून 60/70 किलोमीटर दूर वेगवेगळ्या नातेवाईकांच्याकड़े राहावे लागले. त्यांनी 3 वेळा गावात येण्याचा प्रयत्न केला तर तिन्हीवेळा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर करण्यात आले, असाही आरोप या सेगोकार कुटुंबाने केला आहे. इतकेच नाहीतर वाळीत टाकले गेल्याचाही आरोप या लोकांनी केला आहे.



पण या पीडित कुटुंबाच्या मदतीला आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस आणि पीस या सामाजिक संघटनेने धाव घेतला. संस्थेचे प्रतिनिधी विनोद ताटके यानी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी एन के सोनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर




अखेर तीन वर्षांनी पोलीस सुरक्षा दिली आहे. एवढेचत नाही तर नव्हे तर दरमहीना उपविभागीय अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देवून त्या कुटुंबाची सुरक्षितता योग्य प्रकारे होते आहे का ? कुठल्या प्रकारची अड़चण आहे का याबद्दल चौकशी करून तो अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Updated : 28 Dec 2020 7:23 PM IST
Next Story
Share it
Top