Home > मॅक्स रिपोर्ट > पोलिसांच्या मारहाणीत पारधी व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

पोलिसांच्या मारहाणीत पारधी व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

जय भिम सिनेमामधून दलितांवर होणारा अन्याय, तो अन्याय दडपणारी यंत्रणा याचे भीषण चित्र मांडले गेले. याच सिनेमाच्या कथेसारखा प्रकार बीड जिल्ह्यात प्रत्यक्षात घडल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी म्हणून अटक केलेल्या एका पारधी व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची कहाणी मांडणारा सागर गोतपागर यांचा रिपोर्ट....

पोलिसांच्या मारहाणीत पारधी व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप
X

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या शिरसाळे पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंसारोळा या गावातील 48 वर्षीय देविदास काळे या व्यक्तीचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 4 जुलै रोजी चोरीच्या गुन्ह्यात देविदास वडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती. त्यांना 5 तारखेला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर देविदास यांना सोनपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले पण नंतर त्यांचा मृतदेह शिरसाळे पोलीस हद्दीत सापडला.




मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे म्हणणे काय?

यासंदर्भात त्यांच्या पत्नीकडून त्या दिवशी नेमके काय घडले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सूनंदाबाई देविदास काळे यांनी सांगितले की "दहिपले नावाचा पोलीस आणि इतर त्यांना मारहाण करत घेऊन गेले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी फोन करून सांगितले की त्यांना उद्या कोर्टात हजर करणार आहोत. म्हणून मी पोलीस ठाण्यात गेले पण मला भेटू दिले नाही, बोलू दिले नाही. तेथून त्यांना परभणीला नेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी कोर्टाने त्यांना जामीन दिला. तरीही दुसरे पोलीस न्यायला आलेत म्हणून ते पळू लागले. मी पाहत होती की पोलीस म्हणत होते की तो उसात लपला आहे. इतर लोक आणि पोलिसांनी त्या उसाला घेरलेलं होते. आम्हाला पोलिसांनी जाऊ दिले नाही अटक केली. तीन दिवसात न्यायालयात देखील नेले नाही. आम्हाला तिसऱ्या दिवशी सोडून दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे कळले. आम्हाला न सांगताच त्यांना दवाखान्यात नेऊन पोस्ट मार्टम केलं. अजूनही आम्हाला शेवटचं पाहू दिलेलं नाही. माझ्या नवऱ्याला पोलिसांनी मारलेले आहे. फोटोत असलेला शर्ट हा त्यांचा नाही. त्यांचं पुन्हा एकदा पोस्ट मार्टम करावे आणि आम्हाला न्याय मिळावा", अशी मागणी त्यानी केली आहे.



पोलिसांचे म्हणणे काय?

देविदास काळे हे पळून गेल्यापर्यंतचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. या घटनेत पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही शिरसाळे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला ते म्हणाले, "सदरील व्यक्ती हा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उसाच्या शेताला लावलेल्या कुंपणाच्या तारेला चिटकला असल्याचे संबंधित शेतकऱ्याने शिरसाळा पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व ती बॉडी त्यांनी ताब्यात घेतली व नंतर ती अनोळखी असल्याचं सोशल मीडियावर त्यांनी टाकलं. मात्र माजलगाव पोलीस स्टेशन येथील एक पोलीस कर्मचारी यांच्या तो ओळखीचा असल्याचं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं नंतर त्या व्यक्तीची ओळख पटली. देविदास काळे या व्यक्तीचा जो मृत्यू झाला आहे त्याची ओळख लवकर न पटल्यामुळे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले".




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ती अनोळखी असल्याचे ते सांगत आहेत. ते ज्या व्यक्तीला अनोळखी सांगत आहेत. त्याला वडगाव तसेच नंतर सोनपेठ पोलिसांनीच अटक केलेली होती. न्यायालयात हजर केलेले होते, असे असताना ती व्यक्ती पोलिसांना अनोळखी कशी वाटली? शव विच्छेदन करताना त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले नाही. त्यामुळे काळे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का अशी शक्यता बळावते.

पीडित कुटुंबाच्या वकिलांचे म्हणणे काय?

दरम्यान ॲड. विलास लोखंडे यांनी देविदास यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला असून दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे पत्र येऊनही त्यांची बॉडी नेली जात नाही. हा पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असून यामध्ये इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे तसेच त्रिस्तरीय समिती नेमून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

"आम्हाला रात्री नवू वाजता एका धाब्यावर पोलिसांनी धरलं होतं, चुलत्याला बाजारातून धरून आणलं होत त्यांनी, रात्री सोनपेठ पोलिसांनी दहा वाजेस्तोवर आम्हाला मारल, त्यांनी माझ्या अवघड ठिकाणी, संडासच्या जागेवरसूर्यप्रकाशाच तेल टाकून मारल. मला lock UP मध्ये टाकले. चुलत्याला दोन तीन वेळा शॉक दिला. तसं करून मंगळवारी त्यानला उसात मारून टाकलं. त्यांच्या अंगावरच शर्ट पांढर होतं. आणि मेल्यावर अंगावर होत ते शर्ट पोलिसांचच व्हत".

मृत आरोपी देविदास काळे यांचा बाल गुन्हेगार असलेला पुतण्या चिन्मय ( बदललेले नाव ) याने दिलेली हि प्रतिक्रिया. चिन्मय हा देविदास काळे यांच्यासोबतच एक रात्र पोलीस कारागृहात होता. त्याचा चुलता देविदास काळे याला पोलिसांनी शॉक देऊन मारल्याचा आरोप त्याने केला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या शिरसाळे पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंसारोळा या गावातील 48 वर्षीय देविदास काळे या व्यक्तीचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने देखील केला आहे. 4 जुलै रोजी चोरीच्या गुन्ह्यात देविदास वडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती. त्यांना 5 तारखेला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास यांना सोनपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले पण नंतर त्यांचा मृतदेह शिरसाळे पोलीस हद्दीत सापडल्याचे पोलिसांनी कळवले. यावेळी त्यांना न सांगताच या मृतदेहाचे शव विच्छेदन केल्याची माहिती त्यांनी मॅकस महाराष्ट्रला दिली

मृत व्यक्तीच्या पत्नीचे म्हणणे काय?

यासंदर्भात त्यांच्या पत्नीकडून त्या दिवशी नेमके काय घडले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सूनंदाबाई देविदास काळे यांनी सांगितले की "दहिपले नावाचा पोलीस आणि इतर त्यांना मारहाण करत घेऊन गेले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी फोन करून सांगितले की त्यांना उद्या कोर्टात हजर करणार आहोत. म्हणून मी पोलीस ठाण्यात गेले पण मला भेटू दिले नाही, बोलू दिले नाही. तेथून त्यांना परभणीला नेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी कोर्टाने त्यांना जामीन दिला. तरीही दुसरे पोलीस न्यायला आलेत म्हणून ते पळू लागले. मी पाहत होती की पोलीस म्हणत होते की तो उसात लपला आहे. इतर लोक आणि पोलिसांनी त्या उसाला घेरलेलं होते. आम्हाला पोलिसांनी जाऊ दिले नाही. आम्हालाही अटक केली. तीन दिवसात न्यायालयात देखील नेले नाही. आम्हाला तिसऱ्या दिवशी सोडून दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे कळले. न सांगताच त्यांना दवाखान्यात नेऊन पोस्ट मार्टम केलं. अजूनही आम्हाला शेवटचं पाहू दिलेलं नाही. माझ्या नवऱ्याला पोलिसांनी मारलेले आहे. फोटोत असलेला शर्ट हा त्यांचा नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा", अशी मागणी त्यानी केली आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

देविदास काळे हे पळून गेल्यापर्यंतचा घटनाक्रम त्यांच्या पत्नीने सांगितला. या घटनेत पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही शिरसाळे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला ते म्हणाले, "सदरील व्यक्ती हि एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उसाच्या शेताला लावलेल्या कुंपणाच्या तारेला चिटकला असल्याचे संबंधित शेतकऱ्याने शिरसाळा पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व ती बॉडी त्यांनी ताब्यात घेतली व नंतर ती अनोळखी असल्याचं सोशल मीडियावर त्यांनी टाकलं. मात्र माजलगाव पोलीस स्टेशन येथील एक पोलीस कर्मचारी यांच्या तो ओळखीचा असल्याचं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं नंतर त्या व्यक्तीची ओळख पटली. देविदास काळे या व्यक्तीचा जो मृत्यू झाला आहे त्याची ओळख लवकर न पटल्यामुळे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले".

मृत देविदास काळे यांची पत्नी आणि पुतण्याने दिलेल्या प्रतीक्रीयेनंतर या मृत्यूबाबत संशयास्पद मुद्दे उपस्थित होतात.

मृतदेह पोलिसाना अनोळखी कसा ?

देविदास काळे यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती. त्याला कोर्टात देखील हजार केले गेलेले होते. अटक झालेला रेकॉर्डवर असलेला आरोपी त्याच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासाठी अनोळखी कसा असू शकतो?

मृतदेह अनोळखी असल्यास ओळख पटविण्याचा प्रयत्न का केला नाही?

जरी मृतदेह अनोळखी आहे असे मान्य केले तर त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? थोडा प्रयत्न केला असता तरी त्याची तातडीने ओळख पटली असती. तरी देखील अनोळखी म्हणून शव विच्छेदन करण्याची घाई का केली गेली ?

अटकेत असणाऱ्या मृताच्या पत्नीला मृतदेहाबाबत माहिती का दिली नाही ? मृत देविदास काळे याची पत्नी सुनंदाबाई या पोलिसांच्या अटकेत होत्या. त्याना त्यांच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळवण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना हि माहिती का देण्यात आली नाही ?

शर्ट कोणी बदलला ? मृत देविदास काळे याच्या अंगावर कोठडीत असताना पांढरा शर्ट असल्याचे त्याचा पुतण्या सांगतो. पोलिसांनी नंतर वायरल केलेल्या फोटोत असलेला तो शर्ट त्याचा नसून तो पोलिसांनी घातला असल्याचा आरोप त्याने केला आहे. मृताच्या पत्नी सुनंदाबाई यांनी देखील मृतदेहावरचा शर्ट हा त्यांचा नसल्याची माहिती दिली आहे. हे खरे आहे का ? असल्यास तो शर्ट नक्की का बदलण्यात आला ?

मृताच्या पत्नीला अटक करून तब्बल तीन दिवस न्यायालयात नेले नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा आरोप खरा असल्यास अटक करून तातडीने २४ तासाच्या आत कोर्टासमोर उभे करण्याचा नियम असताना एका स्त्री ला तीन दिवस कोठडीत का ठेवले गेले? तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी तिला का कळविण्यात आली नाही ?

अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचा आदेश असतानाही दुसर्यांदा शवविच्छेदन करण्यासाठी विलंब का लावला ?

कुटुंबीय तसेच सामाजिक संघटनांच्या आंदोलनानंतर मृतदेहाचे दुसर्यांदा शवविच्छेदन करावे असे पत्र ८ तारखेला आलेले असताना येथील पोलीसानी १० तारखेला शव विच्छेदन करण्याकरीता पाठवला हि दिरंगाई का केली गेली ? हि दिरंगाई आरोपीला फायदा मिळवून देण्यासाठी फायद्याची झाली का ? या कालावधीमध्ये काही पुरावे नष्ट करण्यात आले का ?

पहिल्या शव विच्छेदन अहवालात आलेल्या निरीक्षणानुसार मृत्युचे कारण इलेक्ट्रिक शॉक असे होते तर यानंतर तातडीने गुन्हा नोंद का करण्यात आला नाही?

दुसर्या शव विच्छेदन अहवालात देखील suspected Electerical shock असे निरीक्षण आहे. दोन्ही अहवालात असलेला इलेक्ट्रिक शॉक कुणी दिला याचा तपास अथवा अज्ञातावर तरी गुन्हा का दाखल केला गेला नाही ?

चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका अल्पवयीन आरोपीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. हे खरे असेल तर हे कृत्य करणाऱ्या पोलिसांवर या कायद्याआन्वये गुन्हा कधी नोंद होणार ?

गुन्हा नोंद होणार तरी कधी

शव विच्छेदन अहवालात नमूद असलेलया मृत्युचे कारण पाहता तो विजेचा शॉक देणाऱ्यावर गुन्हा नोंद कधी होणार. यामध्ये इतकी दिरंगाई का केली जात आहे ?

आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता: दुबार शव विच्छेदन तसेच गुन्हा नोंद करण्यास होत असलेली दिरंगाई हि आरोपीला फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. घडलेली घटना पाहता या दरम्यानच्या कालावधीत आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेमध्ये असणाऱ्या साक्षीदारांवर देखील दबाव आणण्याची शक्यता आहे.

या घटनेमध्ये पोलिसांवर असलेला संशय अधिकच बळावणारे वरील मुद्दे उपस्थित होतात.

पीडित कुटुंबाच्या वकिलांचे म्हणणे काय?

दरम्यान अॅड. विलास लोखंडे यांनी देविदास यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला असून दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे पत्र येऊनही त्यांची बॉडी नेण्यास दोन दिवस उशीर केला गेला. हा पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असून यामध्ये इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे तसेच त्रिस्तरीय समिती नेमून याची सखोल चौकशी करावी. यामध्ये पोलिसांनी केलेले वर्तन कायद्याशी विसंगत असल्याचे दिसून येते. एका बाल आरोपीवर देखील पोलिसांनी अमानुष अत्याचार केला असल्याची माहिती दिली आहे. वरील सर्व गुन्ह्यांचे स्वरूप हे गंभीर आहे. यामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात तातडीने गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केली आहे.

देविदास काळे यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय अहवालात नोंद करण्यात आलेले निरीक्षण, मयत काळे यांच्या पत्नीचे म्हणणे, त्यांनी सांगितलेला घटनाक्रम, एकाच कोठडीत असलेल्या मयताच्या पुतण्याने दिलेली माहिती हे सर्व पाहता या प्रकरणामध्ये पोलिसांवर कुटुंबीयांनी केलेला आरोप आणखीनच गडद होत जातो. यामध्ये अनेक संशयास्पद बाबी ठळकपणे समोर येतात. पोलिसांचे वर्तन देखील संशयास्पद दिसून येते. एका आरोपीचा संशयास्पदरीत्या मृत्यू होतो आणि त्यानंतरही गुन्हा नोंद होत नाही. त्यादृष्टीने तातडीने तपास केला जात नाही. हि बाब कायद्याच्या राज्यात अतिशय गंभीर आहे. या मृत्यूचा तपास या सर्व कंगोर्यांच्या अनुशंघाने व्हायला हवा. यामध्ये आरोपी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. तरच सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या नाशासाठी असलेली पोलिसांच्या भूमिकेविषयी नागरिकांना सुरक्षित वाटेल. अगोदरच गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समूहामध्ये पोलिसांविषयी असलेला समज आणखीनच तीव्र होईल.



Updated : 21 July 2022 4:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top