Home > मॅक्स रिपोर्ट > बीड जिल्ह्याचे 5 मोठे प्रश्न शिंदे सरकार सोडवणार का?

बीड जिल्ह्याचे 5 मोठे प्रश्न शिंदे सरकार सोडवणार का?

बीड जिल्ह्याचे 5 मोठे प्रश्न शिंदे सरकार सोडवणार का?
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील आपल्या भाषणात राज्याचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असेल असे सांगितले. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांना आपापल्या भागातील समस्या सुटतील का, असा प्रश्न पडला आहे. याबाबत बीड जिल्ह्यातील नागरिकांना कोणते 5 महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे, याबाबत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी विचारले असता त्यांनी मूलभूत आणि महत्त्वाचे प्रश्न मांडले.

बीड जिल्ह्याचे पाच मोठे प्रश्न

1. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून मुलींचा जन्मदर प्रमाण कमी झाला आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्यामधील एकूण 16 जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता. सरकारने वेगवेगळे योजना आणून त्या मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पण आजही बीड जिल्ह्यामध्ये सर्रासपणे पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. "त्यामुळे आमची सरकारकडे अशी अपेक्षा आहे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे" असे मत अनेकांनी व्यक्त केले.

2. शिंदे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त झाला पाहिजे.

3. पीक विमा आणि पीक कर्ज, शेतीची नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची सोय झाली पाहिजे.

4. बीड जिल्ह्यात रेल्वेचे जाळे कधी उभे राहणार?

5. बीड जिल्ह्याच्या वाट्याचा पूर्ण निधी कधी मिळणार?


Updated : 5 July 2022 8:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top