काँग्रेस नेत्याच्या घरातून १५ लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी
Max Maharashtra | 14 Feb 2019 12:22 PM IST
घरकामं करणाऱ्या नोकरानंच घरमालकाच्या घरातील मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या घरी ही चोरी झालीय.
नाशिक शहरातील टिळकवाडी इथं दौलत नावाच्या बंगल्यात हेमलता पाटील राहतात. हा बंगला त्यांच्या सासऱ्याचा आहे. मंगळवारी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घरकाम करणाऱ्या आकाश श्रीपाद म्हस्के याने घरातील १५ लाख रूपयांची सोन्याची बिस्किटे आणि १० हजारांची रोकड लंपास केल्याचा संशय पाटील कुटुंबियांना आहे. चोरीच्या घटनेनंतर आकाश बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध सरकारवाडा पोलिस घेत आहेत.
Updated : 14 Feb 2019 12:22 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire