Home > मॅक्स रिपोर्ट > 'स्क्रब टायफस' आजाराचा वाढता धोका

'स्क्रब टायफस' आजाराचा वाढता धोका

स्क्रब टायफस आजाराचा वाढता धोका
X

स्वाईन फ्लु, डेंग्यू या आजाराची दहशत कायम असतानाच आता "स्क्रब टायफस' या आजाराचं सावट राज्यावर पसरू लागलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह सहा राज्यांना या आजाराबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराची भीती पसरली आहे.

काय आहे हा "स्क्रब टायफस' आजार?

पाऊस पडला की या आजाराचे रूग्ण आढळून येतात. "ओरिएन्शिया सुसुगामुशी' या बॅक्‍टेरियामुळे होणारा हा आजार आहे. गवतात, झुडपांमध्ये हा "स्क्रब टायफस' नावाचा कीडा आढळतो. तो चावल्यावर त्याची पिलावळ मानवाच्या त्वचेला चिकटून बसतात. ते मानवाचे रक्‍त शोषण करतात तसेच शरीरात प्रवेश करतात. त्यांच्या सोबत "ओरिएन्शिया सुसुगामुशी' हे बॅक्‍टेरियाही प्रवेश करतात. हा कीडा ज्या ठिकाणी चावतो त्या ठिकाणी काळा डाग पडतो. कीडा चावल्यावर सुरूवातीला एक आठवडा या आजाराची काहीही लक्षणं दिसत नाही. मात्र, त्यानंतर ताप येणे, शरीरातील पाणी कमी होणे, स्मृतीभ्रंश होणे सारखे लक्षणं दिसून येतात. यावर उपचार सोपे आहेत. मात्र, हा आजार झाल्याचं लक्षात येणं महत्वाचं आहे. अन्यथा वेळीच उपचार न झाल्यास मृत्यूही होऊ शकतो.

२००४ मध्ये हिमाचल प्रदेश राज्यात सर्वप्रथम या आजाराची नोंद झाली. त्यानंतर २०१७ मध्ये देशातील विविध भागात या आजाराचे तुरळक रुग्ण आढळून आले. या आजाराची पहिली नोंद १८९९ साली जपानमध्ये झाली. त्यानंतर भारतात दुसऱ्या महायुद्धात आसाम मध्ये या आजाराच्या रूग्णांची नोंद झाली होती. राजस्थान, जम्मू-काश्‍मिर, हिमाचल प्रदेश, आसाम, तामिळनाडू, नागालँड आणि मनिपुर या राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या आजाराची गंभीर दखल घेतलीय. नागरिकांनीही काळजी घेण्याची आणि या आजाराची लक्षणं आढळल्यास त्वरीत उपचार घेण्याची गरज आहे.

Updated : 1 Nov 2017 7:29 PM IST
Next Story
Share it
Top