हिंदुस्थानी भाऊ ला ४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन आंदोलन करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास फाटक याला धारावी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
X
दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन आंदोलन करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास फाटक याला धारावी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करत हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर या आंदोलनासाठी विकास फाटक याने व्हिडीओच्या माध्यमातून चिथावणी दिल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगत होते. त्यावरून हिंदुस्तानी भाऊ म्हणून सोशल मीडियावर प्रसिध्द असलेल्या विकास फाटक याच्याविरोधात पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
सोमवारी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर विकास फाटक याच्याविरोधात राज्यभरातून विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तर विकास फाटक याच्याविरोधात गुन्हा दाखल करून धारावी पोलिसांनी अटक केली. तर त्यानंतर विकास पोलिसांनी कडक बंदोबस्तात विकास फाटक याला न्यायालयासमोर हजर केले.
तर सरकरी वकील प्रसाद जोशी यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. त्यामध्ये 800 हून अधिक विद्यार्थी स्वतःहून आले हे शक्य नाही. त्याच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणी पैसे दिले हे आम्हाला शोधायचे आहे आणि आम्हाला शंका आहे की विद्यार्थ्यांना पाठवण्यामागे काही संघटना आहेत असे मत व्यक्त केले. तर विकास फाटक याच्या वकीलाने युक्तीवाद करताना सांगितले की, "माझ्या आशिलाने बिनशर्त माफी मागितली आहे. या घटनेत झालेल्या नुकसानीचा सर्व खर्च उचलण्याचीही त्यांची तयारी आहे. आम्ही शिक्षा कमी करण्याची विनंती करतो." मात्र त्यानंतर पोलिसांनी विकास फाटक याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.