नितीन गडकरी यांना 'हे' मान्य आहे का? संजय राऊत यांचा सवाल
X
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणे यांच्या मुलांकडून टीका केली जात आहे. यावरून आज संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी भाजपच्या नेत्यांना हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल केला आहे.
शरद पवार हे टार्गेट आहेत. शरद पवार यांना बदनाम करायचं. काय संबंध लावतात, दाऊद सोबत.. काय आहे दाऊद? कोण आहेत दाऊद? ही कालची पोरं, काल पक्षात आलेली पोरं… पवारसाहेबांसारख्या नेत्यावर ज्या भाषेत बोलतात. हे फडणवीसांना मान्य आहे का? हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मान्य आहे का? हे नितीन गडकरी यांना मान्य आहे का? जर मान्य नसेल तर महाराष्ट्राचे पुढारी म्हणून पुढे येऊन याचं खंडण केलं पाहिजे. निषेध केला पाहिजे.
राजकीय मतभेद तुमचे असू शकतात. मात्र, ज्या पद्धतीची भाषा महाराष्ट्रात वापरली जात आहे. शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यांविषयी वापरली जाते. आणि काय बोललो आम्ही पवारांचे चमचे… हो बोला तुम्ही मात्र या महाराष्ट्रात नेत्यांची सन्मान राहिला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्र घडवायला योगदान दिलं आहे. त्यांच्याविषयी कोणत्या प्रकारची भाषा भारतीय जनता पक्षाचे नेते वापरत आहेत. असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. पाहा काय म्हणाले संजय राऊत…