Home > Max Political > ED च्या कार्यालयात जाण्याअगोदरच एकनाथ खडसेंची CD बिघडली ?

ED च्या कार्यालयात जाण्याअगोदरच एकनाथ खडसेंची CD बिघडली ?

ED च्या कार्यालयात जाण्याअगोदरच एकनाथ खडसेंची CD बिघडली ?
X

भोसरी MIDC प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ED ने अटक केली आहे. त्यानंतर आता एकनाथ खडसेंना थेट ED ने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडसेंना आज सकाळी 11 वाजता चौकशी साठी हजर राहण्याचे समन्स आहे. त्याअगोदर खडसे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र काही तासांनी एकनाथ खडसेंची तब्बेत खराब असल्याचं कारण देत पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. या पत्रकार परिषदेत खडसें कोणता बॉम्ब टाकतात याकडे सर्वांचे लक्ष होते.

यात सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शरद पवारांसमोर खडसेंनी माझ्या मागे ED लावली तर मी CD लावीन असं जाहीर केले होतं. आता ईडीने खडसेंच्या जावयाला अटक केल्यानंतर खडसेंनाही ईडीने कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. ईडी थेट खडसेंपर्यंत पोहोचली, आता तरी खडसेंनी जाहीर केल्याप्रमाणे CD येईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतांना ठरलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात आली म्हणजे खडसेंच्या CD ला अजून वेळ आहे.

खडसें ED कार्यालयात हजर होतील का ?

एकनाथ खडसे ED च्या कार्यालयात हजर होतील का ? की वकिलांमार्फत आपलं म्हणणं मांडतील , खडसें स्वतः हजर झाले तर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भोसरी MIDC जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंची दोन वेळा ED कडून चौकशी झाली आहे. ED कडून अटकही होणार होती, मात्र खडसेंनी आपल्याला कोरोना सदृश लक्षण असल्याने तसेच तब्बेतीचे कारण देत खडसें न्यायालयात गेले होते.न्यायालयाने खडसेंना तूर्तास अटक करू नये असं ED ला सांगितलं होतं. मात्र आता खडसेंच्या जावयाला अटक केल्याने खडसेंची अडचण वाढली आहे. मात्र आजही 11 वाजता खडसें ED कार्यालयात जाणार का अशी चर्चा असतांनाच पुन्हा तब्बेत घराब झाल्याचं कारण खडसेंनी दिल असल्याने ईडी कार्यालयात हजर होणार की नाही अजून स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ED चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी ईडीकडे वेळ मागितली आहे.

काय आहे भोसरी जमीन प्रकरण-

भाजप शिवसेना युतीचे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना एकनाथ खडसे यांच्याकडे 12 खाती होती त्यात महसूल खातही होते. याच दरम्यान भोसरी MIDC मधील भूखंड खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसें आणि जावई गिरीश चौधरी यांनी कोलकाता येथील व्यक्ती कडून जमीन खरेदी करतांना ती नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप आहे. यात साडे तीन कोटींचा झालेला आर्थिक व्यवहारही संशयास्पद असल्याची तसेच एकनाथ खडसेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी यंत्रणेचा वापर करून या व्यवहाराला मदत केली, असा आरोप आहे. याबाबत पुणे येथील व्यवसायिक हेमंत गावंडे यांनी तक्रार केली , त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ह्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजल्याने खडसेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला . तसेच ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. आता हेच प्रकरण खडसेंच्या मानगुटीवर आहे.

ईडीने अगोदरच एकनाथ खडसे त्यांची तसेच पत्नी मंदाताई एकनाथ खडसें , जावई गिरीश चौधरी , यांची चौकशी केली आहे. ह्या चौकशीत भोसरी MIDC जमिनीच्या व्यवहारातील पैसे कोठून आले ह्याबाबत तिघांचे जबाब वेगवेगळे आल्याने ईडीला संशय असल्याने अधिक चौकशीसाठी खडसेंची कोठडी मिळवण्याचा ईडीचा प्रयत्न आहे.

Updated : 8 July 2021 11:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top