अदानी बाबत रोज तीन प्रश्न विचारणार - काँग्रेसची मोदी सरकारला तंबी
गेल्या काही दिवसापासुन अदानी समुहाचे मालक अदानी हे नाव सध्या त्यांच्या आर्थिक संकटामुळे चर्चैत आहे. यावर केंद्र सरकार भुमिका घेत नसल्यामुळे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकार हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश एका निवेदनात म्हटले आहे की , पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना दररोज तींन प्रश्न विचारण्यात येणार आहे असे म्हटले आहे
गेल्या काही दिवसापासुन अदानी समुहाचे मालक अदानी हे नाव सध्या त्यांच्या आर्थिक संकटामुळे चर्चैत आहे. यावर केंद्र सरकार भुमिका घेत नसल्यामुळे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकार हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश एका निवेदनात म्हटले आहे की , पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना दररोज तींन प्रश्न विचारण्यात येणार आहे असे म्हटले आहे. अदानी प्रकरणावर केंद्र सरकार मौन बाळगलं आहे. जयराम रमेश म्हणाले की 4 एप्रिल 2016 मध्ये पनामा पेपर खुलासा करण्यात आला आहे. या खुलाशांच उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने घोषणा केली होती की, मोदी यांच्याकडून एका मल्टी एजन्सी सर्च एजन्सीला आर्थिक देवाण घेवाणीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
As a part of its 'Hum Adani Ke Hai Kaun' protest series, @INCIndia will ask 3 questions to the Modi govt everyday on its alleged collusion with the Adani conglomerate. Today's questions are on LIC investment in the Adani group. Read here 👇 https://t.co/Gkw94hdbm5
— Ishadrita Lahiri (@ishadrita) February 6, 2023
त्यानंतर ५ सप्टेंबर २०१६ रोजी हाँग्जो (चीन) येथे जी-२० शिखर संमेलनात तुम्ही (मोदी) म्हणालात की, आम्ही आर्थिक गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रय नष्ट करण्यासाठी, त्यांना ट्रॅक करण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहोत. भ्रष्ट आणि त्यांच्या कारवाया लपवणाऱ्या बँकिंग गुप्ततेवर कारवाई करु. त्यावर कोणतीही अंमलबजावणी नाही. अब तुमचं सरकार HAHK (हम अदाणी के कौन हैं) पासून लपू शकत नाही. वृत्तसंस्थेनुसार, जयराम रमेश यांनी गौतम अदानीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. पनामा पेपर्स आणि पेंडोरा पेपर्स घोटाळ्यात गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचे नाव पुढे आल्याचे रमेश म्हणाले.
"HAHK-हम अडानी के हैं कौन" श्रृंखला के तहत प्रधानमंत्री से हमारे आज के तीन सवाल। उनकी चुप्पी न सिर्फ रहस्यमई है बल्कि चुभने वाली भी है।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) February 6, 2023
चुप्पी तोड़िए प्रधानमंत्री जी! pic.twitter.com/9uMQ1cYGed
बहामास आणि ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये ऑफशोअर संस्था चालवणारे म्हणून विनोद अदानी यांचे नावही समोर आले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय (CBI) आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांसारख्या सरकारी संस्थांचा गैरवापर केला आहे. तसेच जे उद्योगपती मोदींच्या बाजूने नव्हते त्यांना मोदी सरकारने या संघटनांच्या जोरावर शिक्षा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अदानी समूहावर विविध आरोप होत आहेत, मोदी सरकारने त्याची कधी चौकशी केली आहे का, की त्यावर कारवाई केली आहे का?, असा सवाल रमेश यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या अखत्यारीतील प्रकरणांची नि:पक्षपातीपणे चौकशी होईल, अशी अपेक्षा आहे.