जितेंद्र आव्हाड प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्याप्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे.
X
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरती काही दिवसांपूर्वी महिलेने विनयभंगाचे आरोप केले आहेत. त्यावरून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या गप्प का आहेत? असा सवाल तक्रारदार महिलेने उपस्थित केला होता. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी तक्रारदार महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्याबरोबरच महिलेने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून ठाणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला? याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
तसेच सदरच्या महिलेवरती गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी देखील मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. महिला आयोगाकडे पोलिसांनी अद्यापही अहवाल सादर केला नाही. तसेच आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करावा, असे पत्र महिला आयोगाला मिळाले आहे. म्हणून रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका दाखवत पोलिसांकडे आव्हाडप्रकरणी अहवाल मागवला आहे.