Home > Max Political > शुक्रवारी किरीट सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार

शुक्रवारी किरीट सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार

शुक्रवारी किरीट सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार
X

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने (High Court) अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचले आहे.

किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलाशानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. किरीट सोमय्या म्हणाले संजय राऊत यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले. नील सोमय्यांच्या (Neil Somaiya) कंपनीत वाधवान यांनी पैसे दिल्याचा आरोप केला. मात्र एक कागद देऊ शकले नाहीत. त्यांनी आतापर्यंत अनेक आरोप केले. मात्र प्रत्येक आरोपानंतर न्यायालयाने संजय राऊत आणि ठाकरे सरकारला चपराकच लगावली आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील 12 आमदारांची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. तर संपुर्ण देशातील एकापाठोपाठ एक घोटाळा बाहेर येणारे महाविकास आघाडी हे पहिले सरकार आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. याबरोबरच संपत्ती जप्त झालेल्या ठाकरे सरकारच्या नेत्यांची यादी सोमय्या यांनी वाचून दाखवली. (12 minister property attach by ED, said kirit Somaiya)

सोमय्या म्हणाले, संजय राऊत (sanjay Raut) हे फक्त चेहरा आहेत. तर उध्दव ठाकरे या सगळ्याचे मास्टरमाईंड आहेत. कारण त्यांच्या मेहुण्याचा घोटाळा बाहेर काढला. त्यामुळे संजय राऊत मार्फत मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तर उद्या उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

बाबासाहेबांविषयी किरीट सोमय्या काय म्हणाले- (Kirit Somaiya on Dr. babasaheb ambedkar birth anniversary) किरीट सोमय्यांना न्यायालयाने दिलासा दिल्याबाबत विचारले असता सोमय्या म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. तर न्यायालयीन व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिली. त्यामुळे आमचा न्यायालयावर पुर्ण विश्वास आहे.

नॉट रिचेबल असण्याबद्दल सोमय्या काय म्हणाले- मी नॉट रिचेबल काही व्यक्तींसाठी होतो. बाकी माझे सर्व काम व्यवस्थित सुरू होते. त्यामुळे मी फरार वैगेरे नव्हतो, असे स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर दिले.

Updated : 14 April 2022 6:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top