अमित ठाकरे कोणत्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठन करणार?
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेल्या आवाहनानंतर अमित ठाकरे कोणत्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठन करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
X
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत दिलेला अल्टीमेटम आज संपला. त्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत अमित ठाकरे कोणत्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठन करणार असा सवाल राज्यभरातून केला जात आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मशिदीवरील भोंग्याबाबत भुमिका घेतली होती. तर ठाणे येथील सभेतून 3 मेचा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र त्यापाठोपाठ 1 मे रोजी झालेल्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी 3 मे ऐवजी 4 मे चा इशारा दिला. त्यानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर त्यांचे पुत्र अमित ठाकरे कोणत्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठन करणार असा सवाल विचारला जात आहे.
राज ठाकरे यांनी 3 मे रोजी राज्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रातून केले आहे. त्यापार्श्वभुमीवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह राज्यभरातील हजारो मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनामुळे बहुजन तरुणांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचं करीयर उध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे कोणत्या मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा पठन करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मुंबई पोलिस एक्शन मोडवर
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस सतर्क झाले आहेत.