Pankaja Munde : भगवान गडावर पंकजा मुंडें आज काय बोलणार? उत्सुकता शिगेला
X
Dasara Melava 2023 - राष्ट्रसंत भगवान भक्तीगडावर आज होत असलेल्या दसरा मेळाव्याची तयारी जय्य्यत सुरु आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज सुरवातीला वैद्यनाथचे दर्शन घेतील, नंतर माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मुर्ती स्थळास वदंन करणार आहेत. त्यानंतर त्या भगवान गडाकडे रवाना होणार आहे. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा आणि परळी येथील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यास आज विशेष महत्व आहे. प्रत्येकाला आपल्या अस्तिवाची परिक्षा देण्याची हीच वेळ आहे. पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहे. आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यंदाचा मेळावा भव्य असणार आहे. लोकांना मला ऐकायचे आहे. आणि लोकांचेही मला ऐकायचे आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेले संतातर नाट्य, पक्षात वारंवार डावलले गेल्याची नाराजगी या अनुषंगाने आजचा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतील या कडे सारणाचे लक्ष्य आहे. दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यानी काळजी घेण्याचे आव्हान मुंडे यांनी केले आहे.