महिलांओं की चिंता क्या सिर्फ महिला करेगी? , अमित शहा यांचा अधीर रंजन चौधरी यांना सवाल
X
केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं. यावेळी निशिकांत दुबे बोलायला उभे राहिले असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावरून अमित शहा यांनी हस्तक्षेप केल्याचं पहायला मिळालं.
महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षाने गोंधळ केल्याचे पहायला मिळाले. त्यावरून अमित शहा यांनी अधीर रंजन चौधरी यांना लगावला.
जेव्हा निशिकांत दुबे हे बोलायला उभे राहिले. त्यावेळी महिलांना बोलण्याची संधी देण्याची मागणी करत अधीर रंजन चौधरी यांच्यासह विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर अमित शहा यांनी हस्तक्षेप केला. यावेळी अमित शहा म्हणाले, महिलांची चिंता फक्त महिलांनीच करायची का? आपण कोणत्या प्रकारच्या समाजाची रचना करत आहात. महिलांच्या समस्यांवर महिलांपेक्षा पुरुषांनी बोललं पाहिजे. तुम्हाला आधी बोलायला संधी मिळाली नाही म्हणून तुम्हाला जेलसी फील होत आहे का? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी केला.