तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ :जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिक यांच्या जावयावरील अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाची चर्चा अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडली.
X
"पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. प्रामुख्याने जयंत पाटील यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील यांनी, 'धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे'.असं मत मांडले आहे.
याचसोबत नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया देत, मला वाटतं नवाब मलिक यांच्याबाबत त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
सोबतच भाजप नेते कशा भूमिका मांडतात हे सर्वांना माहिती आहे. ते राजीनामा मागू शकतात. जावयानं गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सरकारी हस्तक्षेप कुठल्याही गोष्टीत होत नाही. सर्व सामान्य लोकांना आता माहिती झालं आहे. केंद्र सरकार त्यांच्या संस्थाविरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरल्या जात आहेत, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.