Home > Max Political > आम्ही दरवाजासमोर उभं राहणार नाही..राऊतांचे मोदींवर खडेबोल..!

आम्ही दरवाजासमोर उभं राहणार नाही..राऊतांचे मोदींवर खडेबोल..!

आम्ही दरवाजासमोर उभं राहणार नाही..राऊतांचे मोदींवर खडेबोल..!
X

मोदींचे उफाळून आलेले प्रेम खोटं आहे, ते नकाश्रू आहेत, मोदींनी खिडकीच काय पण दरवाजा जरी उघडला तरी आम्हाला फरक पडणार नाही असे विधान करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी संजय राऊत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात आणि मूळ शिवसेनेत नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या आहेत. हिंदुह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर मोदींचे एवढेच प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा पध्दतीने फोडली नसती. आणि ही शिवसेना नुसती फोडली नाही तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचे कृत्य मोदींनी केलं, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदींवर टीका केली.

दरम्यान राऊत पुढे बोलताना म्हणाले की, स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे. मोदींनी दरवाजे उघडले तरी आम्हाला काहीच फरक नाहीत, आम्ही त्यांच्यासमोर उभं राहणार नाही. ते जर असं करत असतील तर याचा अर्थ असा होतो की, नरेंद्र मोदींना बहुमत मिळत नाही, त्यांचा पराभव होत आहे हे दिसतंय म्हणून ते अशा फटी, दरवाजे शोधत आहेत, अशी घणातघाती टीका राऊंतांनी केली.

आमच्या 'ओठात एक आणि पोटात एक' असं कधीच नसतं...!

वाघाच्या ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. वाघ खुलेपणाने फिरतो आणि डरकाळी फोडतो, पण अलिकडच्या काळात मला सांगलीमध्ये बरेच वाघ दिसायला लागले असून त्या वाघांचे जतन करणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासोबत माझी सांगलीबाबत चर्चा झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीतल्या वरीष्ट नेत्यांसोबत माझी चर्चा झालेली आहे. जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा वेगळ्या पध्दतीने चर्चा करतो, असंही राऊत म्हणाले.

बाळासाहेबांसाठी भावूक झाले होते मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं आहे की, बाळासाहेबांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. ते मी कधीही विसरु शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रध्दा आहे. असं म्हणत मोदींनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाल्याचेही पहायला मिळाले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र संजय राऊत यांनी शिवसेना आणि भाजपचे पुन्हा मनोमिलन होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.

Updated : 3 May 2024 12:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top