Home > Max Political > लोकसभा-राज्यसभा चेअर निष्पक्ष आहेत का?

लोकसभा-राज्यसभा चेअर निष्पक्ष आहेत का?

देशाच्या संविधानिक खुर्चीत बसून भारताच्या उपराष्ट्रपतींनी उघडपणे आरएसएसची स्तुती करणे योग्य आहे का? संसदेत खासदारांना RSSवर टीका करण्यास बंदी ! देशासाठी हे धोकादायक आणि चिंताजनक असं का म्हणतायेत खासदार साकेत गोखले वाचा...

लोकसभा-राज्यसभा चेअर निष्पक्ष आहेत का?
X

सध्या 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरु आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला महत्त्वाच्या मुद्द्यांवरून दररोज धारेवर धरत असतानाचे चित्र पाहायला मिळत असून सत्ताधारी पक्षासोबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना देखील विरोधी पक्षाला उत्तरं द्यावी लागत आहे. तसेच दोघेही संसदेचं कामकाज पाहताना निष्पक्ष भूमिका घेत आहेत का असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून पडला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी एक व्हिडिओ ट्विट करत लिहिलं आहे की, राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड हे देशाच्या संविधानिक खुर्चीवर बसून आरएसएस संघटनेवर स्तुतीसुमनं उधळत आहे हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. नेमकं काय म्हटलं आहे खासदार साकेत गोखले यांनी वाचा...


खूप खूप महत्वाचे

हे अत्यंत धक्कादायक आहे आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असलं पाहिजे. 2 जुलै रोजी भारताचे माननीय उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले की, "गेल्या 25 वर्षांपासून मी RSS चा 'एकलव्य' आहे". त्यानंतर त्यांनी आरएसएसची स्तुती केली आणि सांगितले की त्यांना फक्त "खेद" आहे की ते आधी आरएसएसमध्ये सामील झाले नाहीत.

माननीय उपराष्ट्रपती आणि अध्यक्षांनी ते आरएसएसचे अभिमानास्पद सदस्य असल्याची खुली कबुली दिली. माननीय VP आणि अध्यक्ष यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही संस्थेचे सदस्य होण्याचा अधिकार आहे. तसेच, 2 दिवसांपूर्वी, त्यांनी विरोधी पक्षनेते खर्गे यांच्या भाषणातील काही भाग रेकॉर्डमधून काढून टाकले. खर्गे यांनी त्या भाषणात आरएसएसवर टीका केली होती.

आरएसएस ही एक अशी संघटना आहे ज्यावर विध्वंसक कारवायांसाठी ऐकेकाळी बंदी घालण्यात आली होती, हे सुप्रसिद्ध सत्य आहे. ही एक सांप्रदायिक संघटना आहे आणि त्यांनी प्रदीर्घ काळ भारताचे संविधान स्विकारण्यास नकार दिला होता. ज्या संविधानिक खुर्चीत बसून तटस्थ राहणे अपेक्षित आहे, अशा खुर्चीत बसून भारताच्या उपराष्ट्रपतींनी उघडपणे आरएसएसची स्तुती करणे योग्य आहे का?

हे अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक आहे की खासदारांकडूनही आरएसएसवर टीका करण्यावर आता मोदी सरकारमध्ये बंदी घातली जात आहे कारण अध्यक्ष हे आरएसएसचे सदस्य आहेत ज्याची त्यांनी उघडपणे कबुली दिली आहे.

असं खासदार साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Updated : 4 July 2024 12:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top