Home > Max Political > सांगली लोकसभा जागेसंदर्भात विशाल पाटील यांनी घेतली खर्गेंची भेट

सांगली लोकसभा जागेसंदर्भात विशाल पाटील यांनी घेतली खर्गेंची भेट

सांगली लोकसभा जागेसंदर्भात विशाल पाटील यांनी घेतली खर्गेंची भेट
X

सांगली लोकसभा (Sangli loksabha) जिंकण्याची क्षमता काँग्रेसमध्येच असून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळीसोबत आज काँग्रेस नेते मुकूल वासनिक(Mukul Wasnik) आणि आखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी भेट घेतली असल्याची पोस्ट स्वाभिमानी पक्षाचे नेते विशाल पाटील(Vishal Patil) यांनी आपल्या एक्स अकाउंटरून (X handle) शेअर केली आहे.

यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा, अशी भावना जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची असल्याचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (National Congress Party) नेते मुकुल वासनिक यांच्या निदर्शनास आणून दिलं, असल्याचंही विशाल पाटील म्हणाले.




त्यामुळे आता या जगेबाबत शिवसेना(Shivsena) प्रमुख आणि महाविकास आघाडीतील(Mhavikas Aghadi) प्रमुख नेते उध्दव ठाकरे (Udhav Thackary)यांना विनंती करून ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अशी आग्रही मागणी देखील यावेळी करण्यात आली, असं प्रकाश पाटील म्हणाले.

यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचं नेतृत्व माजीमंत्री विश्वजीत कदम(Vishwajeet Kadam), आमदार विक्रम सावंत(Vikram Sawant), सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील(pritviraj Patil) यांची प्रमुख उपसथिती होती.






Updated : 27 March 2024 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top