डाकू, लुटेरे म्हणत विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
X
मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त सरकारकडून जोरदार तयारी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त सरकारने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यापार्श्वभुमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
2014 मध्ये त्यावेळच्या सरकारने 49 हजार 800 कोटीचे बजेट दिलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं, याचं उत्तर आधी सरकारने द्यावं आणि त्यानंतर नव्याने काय करणार ते सांगावं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
त्याबरोबरच आत्महत्याग्रस्त मराठवाड्यातील आत्महत्या मुक्तीच्या घोषणेचं काय झालं, अशा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याबरोबरच सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही विजय वडेट्टीववार यांनी केली.
अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. फडणवीसांची फडणवीसांवर आणि शिंदेंच्या आमदारांची शिंदेंवर असल्याने विकासाच्या नावावर तिजोरी ओरबाडण्याचं काम सध्या सुरु आहे. हे डाकू आणि लुटेरे आहेत. ज्यांना तिजोरी साफ कऱायची आहे. जनतेच्या विकासाचा प्लॅन नाहीतर आमदारांच्या विकासाचा प्लॅन, सरकारकडे असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.