गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा
गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा vijay rupani resigns as Gujrat cm Chandrkant patil is next Cm? Why bjp replace Gujrat face
X
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांची नाव चर्चेत आहेत. त्यामध्ये गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. चंद्रकात पाटील यांच्यासह
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला देखील मुख्यमंत्र्यांची शर्यतीत आहेत.
दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन विजय रुपाणी यांनी आपला राजीना सोपवला आहे. रुपाणी यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण पत्रकारांशी बोलतांना त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. रुपाणी यांच्या रुपाने गेल्या काही दिवसात भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा तडकाफडकी राजीनामा झाला आहे.
यामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा येडियुरप्पा यांनी असाच राजीनामा दिला होता. तर त्याआधी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तिरथ सिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान विजय रुपाणी यांनी भाजपमध्ये पदभार बदल असतो ही प्रक्रिया आहे. नवीन नेत्वृत्वाखाली विकास यात्रा सुरूच राहिल, असे विजय रुपणी यांनी सांगितले आहे. आपण पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडून असेही रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे. आपण विकासकाम केली तर मग राजीनामा का द्यावा लागला, असा सवाल पत्रकारांनी विचारला, तेव्हा विजय रुपाणी यांनी पक्षाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. तसेच पक्ष हा सर्वोच्च आहे, गुजरातच्या विकासाचे काम आधीही सुरू होते आणि यापुढेही तसेच सुरू राहील असेही रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे.
गुजरात विधानसभेची निवडणुक पुढच्या वर्षात होणार आहे. त्याच्या १ वर्ष आधी रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. आता उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जाते की नवीन व्यक्तीवर जबाबदारी दिली जाते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पद दिलं तर गुजरातच्या मुख्यमंत्री पहिला मराठी माणूस मुख्यमंत्री म्हणून जाईल. त्यामुळं महाराष्ट्रातून देखील चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती मिळत आहे.
vijay rupani resigns, vijay rupani Gujrat cm