वैशाली नागवडे मारहाण प्रकरण, भाजप नेते अडचणीत
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. तर वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेते अडचणीत आले आहेत.
X
केंद्रीय मंत्री स्मृति इराणी या पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते स्मृती इराणी यांच्या समोर महागाईच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या दिशेने गेले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्याने वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर होत असून याबद्दल संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांना भाजपच्या पुरूष कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओचा आधार घेत डेक्कन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याबद्दल वैशाली नागवडे यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
पुण्यात नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमित शहा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आल्या होत्या. यावेळी स्मृती इराणी भाषण करायला उभ्या राहिल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. तर यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दरम्यान भाजपच्या पुरूष पदाधिकाऱ्याने वैशाली नागवडे यांना मारहाण केली. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. त्यामुळे या प्रकरणाबद्दल राज्यातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. तर या घटनेमुळे भाजप नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
चित्रा वाघ यांनी केले हल्ल्याचे समर्थन
पुरूष पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये चित्रा वाघ यांनी प्रशांत सुदामराव जगताप यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, कार्यक्रमासाठी नाही तर भाजपचा कार्यक्रम उधळायला आलेल्या अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची का अशा शब्दात भाजपच्या पुरूष कार्यकर्त्याने केलेल्या हल्ल्याचे चित्रा वाघ यांनी समर्थन केले आहे.
कार्यक्रमासाठी नाही तर भाजपाचा कार्यक्रम उधळायला आलेल्या अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 16, 2022
दस्तुरखुद्द @PawarSpeaks साहेबांनाही हा प्रकार नक्कीचं आवडला नसेल ह्याची मला खात्री आहे
आताची राष्ट्रवादी ही साहेबाची राष्ट्रवादी नाही हेचं खरयं… pic.twitter.com/pK6TGOPQIA