Home > Max Political > आम्ही ज्यांच्यासोबत त्यांच्यावर टीका करतो, शरद पवार यांच्यावरील टीकेवरून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

आम्ही ज्यांच्यासोबत त्यांच्यावर टीका करतो, शरद पवार यांच्यावरील टीकेवरून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

आम्ही ज्यांच्यासोबत त्यांच्यावर टीका करतो, शरद पवार यांच्यावरील टीकेवरून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
X

अजित पवार यांच्या बंडानंतर सामनातून सातत्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने उद्धव ठाकरे यांना सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी सामनातून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याच संदर्भाने पत्रकाराने उद्धव ठाकरे यांना सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही ज्यांच्यासोबत असतो. त्यांच्यावर टीका करतो. भाजपसोबत असताना आम्ही भाजपवर टीका करत होतो, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

यावेळी शरद पवार म्हणाले, तुम्ही माध्यमांमधून आमच्यावर टीका केली तर आम्ही आमचं काम करणं थांबवावं का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Updated : 30 Aug 2023 5:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top