उदय सामंत यांनी घेतले मध्यरात्री शिर्डीच्या साईलीला पालखीचे दर्शन...
X
ठाकरे गटाचे नेते उदय सामंत उदय सामंत यांनी शिर्डीच्या साईबाबा पालखीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे १७ एप्रिल रोजी मध्यरात्री दिडच्या सुमारास त्यांनी साईलीला पालखीचे दर्शन घेतले. मागील काही वर्षांपासून या मंदिरातील भजर परंपरा बंद होती. ती बंद झालेली भजप परंपरा पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते पण यात यश आले नव्हते. परंतु यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिर्डी येथील स्थगित झालेली भजन परंपरा पुन्हा नव्याने सुरू झाली, असं यावेळी उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, शिर्डी येथील ही बंद पडलेली भजन परंपरा पुन्हा नव्याने सुरू केल्याने तेथील मंदिर व्यवस्थापक मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी उदय सामंत यांना साईबाबा यांची प्रतिमा देत त्यांचा यथोचित सन्मान-सत्कार केला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत यांचे आभार मानले असल्याचेही यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
आत्ता रात्री दीड वाजता मुंबई येथील साईलीला पालखीचे शिर्डी येथे जाऊन दर्शन घेतले. मागील काही वर्षांपासून शिर्डी येथील बंद असलेली भजन परंपरा सुरू करण्यात अनेकांनी प्रयत्न करून सुद्धा यश नव्हते आले. परंतु यावर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने शिर्डी येथील बंद झालेले… pic.twitter.com/FBCWxQuPXq
— Uday Samant (@samant_uday) April 16, 2024