पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीतून तृतीयपंथी हिमांगी सखी लढणार निवडणूक
X
आखील भारतीय हिंदू महासभाकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी तृतीयपंथी महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना घोषित करण्यात आली आहे. हिंदू भारत महासभाचे प्रदेशाध्यक्ष ऋषि कुमार त्रिवेदी यांनी लोकसभेच्या २० जागांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशातली पहिली तृतीयपंथी महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना तिकीट देण्यात आलं आहे. हिमांगी या तृतीयपंथ्यांच्या सन्मान व अधिकारासाठी लढत आहेत. १२ एप्रिलपासून त्या वाराणसीमध्ये आपला निवडणूक प्रचार सुरू करतील, तर वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. वाराणसीमधून शेवटच्या टप्यात म्हणजेच १ जून २०२४ ला मतदान होईल. हिंदू महासभा ने वाराणसी लोकसभासह २० जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
वाराणसीच्या उमेदवार हिमांगी सखी म्हणाल्या की, तृतीयपंथ्यांना त्यांचा अधिकार व सन्मान देण्यासाठीच त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पंतप्रधानांचा "बेटी बचाओ-बेटी पढाओ" हा नारा चांगला आहे मात्र "तृतीयपंथी वाचवा-तृतीयपंथ्यांना शिकवा" याची आवश्यकता विचारात घेतली नाही. हिमांगी यांची मागणी आहे की, तृतीयपंथ्यांना सुध्दा नौकरी, लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये आरक्षित जागा मिळाल्या पाहिजे ज्याद्वारे ते संसदेत जाऊन आपल्या व्यथा मांडू शकतील.
हिमांगी यांचे वडील सुध्दा गुजरातचेच रहिवाशी तर आई पंजाबी होती. त्यांचं बालपण हे महाराष्ट्रात गेलं. सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या स्थालांतरामुळे त्यांनी अगोदरच पाच भाषेवर प्रभुत्व मिळवलं. विशेष म्हणजे हिंदी इंग्रची, पंजाबी, गुजराती आणि गुजराती या पाचही भाषेत हिमांगी भागवत कथा ऐकवतात.