ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला, तेच गळा काढत आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
X
बुलढाणा जिल्ह्यात शासन आपल्यादारी कार्यक्रम संपन्न झाला. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात १५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून आता पर्यंत १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी मराठा समाजावरून चालत असणाऱ्या राजकारणावरही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की "आमचं सरकार हे घट्ट आहे याला फेव्हिक्यूक चा जोड आहे त्यामुळे हे तुटणार सरकार नाही तर मजबूत सरकार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात १५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून आता पर्यंत १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला' शासन आपल्या दारी' माध्यमातून एकाच छताखाली सर्व योजना देणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असल्याचं मुख्यंमत्री शिंदे यांनी सांगितले.
तर राज्याच मुलींसाठी 'लेक लाडकी' योजने अंतर्गत १८ वर्षाची होईपर्यंत १ लाख रूपये देण्यात येणार असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितले आहे
दरम्यान शिंदे बोलत असताना म्हणाले की "दिल्लीत आम्ही मुजरे करायला जात नाही जनतेसाठी काही ना काही मिळवायला जातो, ज्यानी मराठा समाजाचा गळा घोटला तेच गळा काढायला लागले असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर केली आहे.