Home > News Update > काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांना धमकी देणाऱ्या आरोपीची कसून चौकशी

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांना धमकी देणाऱ्या आरोपीची कसून चौकशी

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांना धमकी देणाऱ्या आरोपीची कसून चौकशी
X

संभाजी भिडे (sambhaji bhide) यांच्यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur)यांनी टीका केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कैलास सूर्यवंशी या युवकाने यशोमती ठाकूर यांना ट्विटर वर पोस्ट टाकत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान काल 8 दिवसाने आरोपी कैलास सूर्यवंशीला यवतमाळ जिल्ह्यातुन पोलिसांनी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली तर संभाजी भिडे समर्थक असल्याचे त्याने सांगत रागाच्या भरात धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. तर मला याचा पच्छाताप असल्याचे देखील त्याने सांगितले. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान चौकशी नंतर त्याला सोडून दिले असून तो वकिलीच शिक्षण घेत असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी सांगितले. दरम्यान आमदार ठाकूर धमकी प्रकरण पावसाळी अधिवेशनात गाजलं होत.


Updated : 10 Aug 2023 8:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top