Home > Max Political > महाविकास आघाडीची बैठक संपन्न, असा ठरला निवडणूकीचा फॉर्मुला

महाविकास आघाडीची बैठक संपन्न, असा ठरला निवडणूकीचा फॉर्मुला

महाविकास आघाडीची बैठक संपन्न, असा ठरला निवडणूकीचा फॉर्मुला
X

महाविकास आघाडीची आज बैठक संपन्न झाली असून यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? याचीही यादी जाहीर केली. त्यानुसार काँग्रेस पक्षाला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पूणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ मिळाले असून काँग्रेसला एकुण १७ जागा मिळाल्या आहेत

तर दुसरीकडे शिवसेना उध्दव ठाकरे गटाला जळगाव, पभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य हे मतदारसंघ मिळाले असून ठाकरे गटाला एकुण २१ जागा मिळाल्या आहेत.

राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या १० जागा आल्या आहेत


Updated : 9 April 2024 4:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top