Home > Max Political > Up Election: शेवटच्या टप्प्यात कोणाचे पारडे जड, काय आहेत राजकीय समीकरणं

Up Election: शेवटच्या टप्प्यात कोणाचे पारडे जड, काय आहेत राजकीय समीकरणं

उत्तरप्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी 54 जागांवर मतदान होणार आहे.

Up Election:  शेवटच्या टप्प्यात कोणाचे पारडे जड,   काय आहेत राजकीय समीकरणं
X

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात एकूण 9 जिल्ह्यांमध्ये 54 जागांसाठी मतदान होणार आहे. ज्यातील 12 जागा राखीव आहेत. साधारणत: 2 कोटी 06 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात आझमगड, मऊ, जौनपुर, गाझीपुर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भरोदी आणि सोनभद्र या नऊ जिल्ह्यामध्ये निवडणूक पार पडत आहे.

या टप्प्यामध्ये बीजेपी आपला सहयोगा पक्ष अपना दल (सोनेलाल) सोबत मैदानात उतरली आहे. तर, दुसरीकडे सपाचा मित्रपक्ष अपना दल (कमेरावादी) सोबत सपा भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात योगी सरकारच्या सात मंत्र्यांचा देखील समावेश आहे. दारा सिंह चौहान, अनिल राजभर, रवींद्र जैसवाल, नीलकंठ तिवारी, गिरीश यादव, रमाशंकर सिंह पटेल, दुर्गा प्रसाद यादव, आलमबदी आजमी, विजय मिश्रा, सुभासपा अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, धनंजय सिंह तसेच मुख्तार अंसारी यांचा मुलगा अब्बास सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड?

2017 विधानसभा निवडणूक

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 54 जागांपैकी 29 जागा जिंकल्या होत्या, तर 7 जागा मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या. सपाला 11 जागा मिळाल्या होत्या, तर 6 जागांवर बसपाने विजय मिळवला होता.

2012 विधानसभा निवडणूक

2012 च्या विधानसभा निवडणुकीत सपाने एकूण जागांपैकी 34 जागा जिंकल्या होत्या, तर बसपाला 7 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आज निवडणूक होत असलेल्या या मतदार संधामध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या खूप मोठी आहे. दलितांमध्ये जाटव मोठ्या प्रमाणात आहेत. दलितांच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७२.५ टक्के जाटव आहेत, तर त्यापाठोपाठ पासी लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे ८ टक्के आहे. या निवडणुक श्रेत्रांमध्ये कुर्मी खालोखाल ओबीसींमध्ये यादवांची सर्वाधिक लोकसंख्या आहे.,सुमारे 16 टक्के लोकसंख्या यादव समाजाची आहे, ज्यांना सपाचा मुख्य मतदार मानले जाते. तसेच, सवर्ण जातींमध्ये ब्राह्मणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, यावेळी ब्राह्मण कोणाच्या बाजूने मतदान करणार? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळचं चित्र वेगळं असेल, असा अंदाज देखील निवडणूक विश्लेषक व्यक्त करत आहेत.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे भाजपला यावेळी येथुन मोठा पाठिंबा मिळण्याची आशा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा युतीला या भागातील दलित आणि ओबीसी मतदारांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. बसपाने गाझीपूर, घोसी, जौनपूर आणि लालगंज लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता, तर अखिलेश यादव आझमगड मतदारसंघातून विजयी झाले होते. अपना दल (सोनेलाल) आणि ओमप्रकाश राजभर यांना देखील या भागात मोठं दिव्य पार करावं लागणार आहे. येथील दोन जागा, रॉबर्टसगंज आणि मिर्जापुर हे कुर्मीबहुल क्षेत्र असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाला (सोनेलाल) येथुन विजयी मिळाला होता.

दुसरीकडे, ओमप्रकाश राजभर देखील या भागातील एक प्रसिद्ध चेहरा असून सपा प्रमुख अखिलेश यादव यांना त्यांच्याकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे, निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, हे 10 मार्च ला मतमोजणी झाल्यानंतरच कळेल.

Updated : 7 March 2022 7:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top