लवकरच ठाकरे चित्रपटाचा दुसरा पार्ट: संजय राऊत
चित्रपटगृहात पुन्हा एकदा घुमणार बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज, लवकरच ठाकरे चित्रपटाचा दुसरा भाग येणार: संजय राऊत
X
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' चित्रपट २०१९ मध्ये आला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकीने मुख्य भूमिका केली होती. 'ठाकरे' चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला होता. चित्रपटाची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते औरंगाबाद येथे एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. ते म्हणाले
मला जेव्हा काम नसते तेव्हा मला चित्रपट पाहायला आवडते. त्यामुळे मला असं वाटलं की ज्या विषयावर कुणी चित्रपट बनवत त्यावर आपण लिहावे. म्हणून मी ठाकरे चित्रपट बनवला. माझी ती इच्छा होती की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट बनवला पाहिजे आणि तो आम्ही बनवला. आता त्याचा दुसरा पार्ट आम्ही बनवत आहोत. त्यामुळे लवकरच ठाकरेचा दुसरा पार्ट येण्याची शक्यता आहे.