काँग्रेसच्या मराठवाड्यातील जनसंवाद यात्रेला तात्पुरती स्थगित
X
शुक्रवारी जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाकरीता आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक हे गंभीर जखमी झालेले पहायला मिळाले. यामुळे अनेक मराठा समाजातील नागरिक आक्रमक होत रस्त्यावर उतरले. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. दरम्यानं काँग्रेस पक्षाच्यावतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे.
राज्य सरकार हे आंदोलन हातळण्यास पूर्ण अपयशी ठरले आहे असल्याने काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हणाले की " जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निंदनीय घटनेनंतर मराठवाड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस पक्षाची आज दि. ३ सप्टेंबर २०२३ पासून नियोजित मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यातील जनसंवाद यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात्रेची नवीन तारिख लवकरच जाहीर करण्यात येईल" असं ट्विट चव्हाण यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निंदनीय घटनेनंतर मराठवाड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस पक्षाची आज दि. ३ सप्टेंबर २०२३ पासून नियोजित मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यातील जनसंवाद यात्रा तात्पुरती… pic.twitter.com/QKMJfp4O6Z
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 3, 2023