Home > Max Political > आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. तेलगू देसम पक्षाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक
X

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने चंद्रबाबू नायडू यांच्यावर पुर्व गोदावरी जिल्ह्यातून शनिवारी सकाळी 6 वाजता अटकेची कारवाई केली. यावेळी चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत त्यांचा मुलगा नारा लोकेश यालाही अटक करणयात आली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली असून आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंध्र प्रदेशातील 250 कोटींहून अधिक रुपयांच्या कौशल विकास घोटाळा प्रकरणी चंद्रबाबू नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये चंद्रबाबू नायडू यांना आरोपी 1 असं नाव देण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआरची कॉपी आणि इतर आदेशांची माहिती दिली होती. यावेळी चंद्रबाबू ना३यडू यांच्या वकिलांनी एफआयआरच्या कॉपीत त्यांचे नाव नसल्याचे म्हटले होते.

त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी नादयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे सभा घेतल्यानंतर ते आपल्या व्हॅनिटीमध्ये आराम करत होते. मात्र पहाटे साडेतीन च्या सुमारास सीआयडीचे एसपी व्हॅनिटीमध्ये आले. त्यावेळी तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घातला. त्यावेळी त्यांनी चंद्रबाबूंना अटक करू दिली नाही. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खआली उतरले. त्यानंतर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी अटकेसाठी सीआरपीसी 21 अंतर्गत नोटीस दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र यासंदर्भातील माहिती न्यायालयात दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. त्यानंतर पोलिसांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली.

Updated : 9 Sept 2023 12:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top