श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेवर सुषमा अंधारेंनी साधला निशाणा...!
X
राज्यात लोकसभा निवडनिणूकांची रणधुमाळी सुरू आहे, आणि अशातच कल्याणच्या लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु ही उमेदवारी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने जाहीर करण्यात आली, यावरून आता उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे, अशी शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.
शिवसेनेचा रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात :
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे शिंदे सेनेवर टीका करताना म्हणाल्या की, कल्याणच्या लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आपुलकी आहे, मात्र त्यांची कल्याण लोकसभेची उमेदवारी ही त्यांच्या वडीलांनी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हवी होती, परंतु तसं न होता त्यांची उमेदवारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने जाहीर करण्यात आली, याचा अर्थ असा होतो की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रिमोट हा भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे, असं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.
कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीस
भारतीय पक्षाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातून विरोध होत असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता, यावर आपली भूमिका मांडत फडणवीस म्हणाले की, कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे हेच शिवसेनेचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील, असं म्हणत फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस असं म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी महायुती मोठ्या ताकदीने उभी राहणार आहे. एवढंच नाही, तर मागच्या निवणूकीपेक्षा या निवडणूकीत जास्त मतांनी निवडून येतील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.