Home > Max Political > Surat Court : राहुल गांधी यांना झटका, 'मोदी' आडनावाचा वाद हायकोर्टात

Surat Court : राहुल गांधी यांना झटका, 'मोदी' आडनावाचा वाद हायकोर्टात

राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हा राहुल गांधी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Surat Court : राहुल गांधी यांना झटका, मोदी आडनावाचा वाद हायकोर्टात
X

Rahul Gandhi : 2019 मध्ये मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायायलायने दोषी ठरवलं होतं. चोरांची नावे मोदीच का असतात? असं वक्तव्य केले होते. मोदी (Modi Surname) आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुतरातमधील आमदार पूर्णेश मोदी (MLA Purnesh Modi) यांनी अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Case) दाखल होता.

कोर्टाने याचिकाकर्ते आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बाजू ऐकून घेत राहुल यांना सुरत कोर्टाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सुरत कोर्टाच्या मानहानी खटल्याविरुद्ध केसला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र राहुल गांधी यांची याचिका सुरत कोर्टाने फेटाळून लावली आहे. दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहे.यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

चोरांचं आडनाव मोदीच का असतं ? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 साली एका निवडणुकीत कर्नाटक (Karnatak) येथे जाहीर सभेवेळी केला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन कसे असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्याविरुद्ध गुजरात राज्यातील सुरत येथील याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा सुरत कोर्टात दाखल केला होता.

गुजरात मधील अनेक जण मोदी आडनावाचे लोक आहेत. त्यांचा अवमान आणि बदनामी राहुल गांधी यांनी केली. मोदी समुदायाच्या भावना दुखावल्या म्हणून पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधीविरुद्ध खटला दाखल केला. 2019 पासून हा खटला चालू होता. 17 मार्च रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर सुरत कोर्टाने निकाल देताना राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

काही वेळानंतर राहुल गांधी यांना जामीनही देण्यात आला. दरम्यान तीस दिवसात राहुल गांधी यांना या बाबत आपलं म्हणणं वरच्या कोर्टात मांडण्याची मुभा होती. मात्र दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व लोकसभा अध्यक्षांनी आपला अधिकार वापरात रद्द केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात अपील केले होते. मात्र कोर्टाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.

Updated : 20 April 2023 2:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top