विधानसभाध्यक्ष निवडणूक: तारीख द्या, बाळासाहेब थोरात यांचा राज्यपालांना सल्ला
X
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज महाराष्ट्रातील विधासभाध्यक्षाच्या निवडणूकीसंदर्भात मॅक्समहाराष्ट्राशी बातचीत केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अधिनियम 1960 च्या नियम 6 आणि 7 मध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूकीसाठी खुल्या मतदान पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. यापुर्वी ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत होती. सरकारने घेतलेल्या या नवीन नियमांच्या विरोधात भाजप नेते गिरिश महाजन आणि अॅड. अभिकल्प प्रताप सिंह, अॅड सिद्धांत धर्माधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने 9 मार्च ला फेटाळली होती. त्यानंतर महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
या संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली पाहा...