रशिया-युक्रेन युध्द थांबवणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही-अजित पवार
X
भारतीय विद्यार्थ्यांना रशिया-युक्रेन युध्दातून वाचवून सुखरूप भारतात परत आणले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका फोनवर हे युध्द थांबवले असल्याचे भाजप सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सांगितल्या जातं. त्यात आता उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा भर टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोनवर रशिया-युक्रेन युद्ध थांबलं, हे काय येड्या-गबाळ्याचे काम त्यासाठी धडाकेबाज नेता लागतो, असा रोखठोक विधान अजित पवारांनी केलं आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी शनिवारी सभा घेतली. यावेळी सभेच्या स्टेजवरून बोलताना त्यांनी पंतप्रधानांची तोंडभरून कौतुक केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, भारतातील काही विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले होते त्यावेळी रशिया आणि युक्रेनमध्ये घणघोर युध्द सुरू होते. यावेळी अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून आपली पाल्ये त्या देशात असून संकटात असल्याचे कळवले होते. याची माहिती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली तेव्हा मोदींनी काळजी न करण्याचा सल्ला दिला, असं अजित पवार म्हणाले.
१० वर्षांच्या कार्यकाळात शिंतोडा उडवण्याचे एकही उदाहरण नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्ममध्ये म्हणजेच १० वर्षांच्या कार्यकाळात असं एकही उदाहरण नाही ज्यावर शिंतोडा उडवता येईल. शेजारी असलेला पाकिस्तान सतत काही-ना-काही तरी कुरापती करायचा, पण त्याला पुलवामा हल्ल्यानंतर असा दणका दिला आहे की, त्यानंतर त्यांने आपल्याकडे पाहिले सुध्दा नाही. आता तो गप्पगार बसला आहे. असं अजित पवार पंतप्रधान मोदींची स्तुती करताना म्हटलं आहे.